ऊसाला सक्षम पर्याय म्हणून केळीची लागवड,
बारामती प्रतिनिधी : वडगाव निंबाळकर ता,बारामती येथील आदर्श शेतकरी राजकुमार चंदुलाल शहा यांनी आपल्या शेतात पिकवलेली केळी आखाती देशात, सौदी अरेबियात निर्यात केली आहे. पारंपारिक ऊस पिकाला सक्षम पर्याय म्हणून केळीची लागवड सरस ठरत आहे.
शहा कुटुंबीय आधुनिक व शास्त्रोक्त पध्दतीचा वापर करून अगदी नियोजनबद्ध पद्धतीने शेती करत आहेत यामुळे राजकुमार शहा यांना शासनाचा आदर्श शेतकरी पुरस्कार मिळालेला आहे. आपल्या शेतात पारंपारिक पद्धतीने ऊस पिक न घेता केळी लागवड करण्याचा निर्णय शहा यांनी घेतला, यासाठी विविध ठिकाणी जाऊन केळी पिकाचा त्यांनी अभ्यास केला तेथील शेतकऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर आपल्या शेतातील माती आणि हवामानाचा अंदाज घेऊन दोन प्रकारच्या केळी रोपांची लागवड केली आहे.
देशी केळी (यलक्की) या वानाची रोपे ३ एकरावर तर ४ एकर क्षेत्रावर जी नाईन या वानाची केळी रोपे लावली आहेत. दोन्ही वानाची रोपे पुणे जवळील थेऊर येथील रोपवाटिकेतून मार्च २०२४ मध्ये खरेदी केली. केळी लागवड करायच्या क्षेत्रात ऊस तोडीनंतर नंतर पाचट कुट्टी गाडली यावर मळी राख शेनखत टाकुन नांगरटी केल्या त्यानंतर सरी पाडल्या जि नाईन दोन सरीतल अंतर ६ फुट रोपातलं अंतर ५ फुट देशी केळी (यलक्की) सरीतल अंतर ७ फुट रोपात ५ फुट आंतर ठेऊन रोपे लावली. ड्रिप (ठिबक सिंचन) अंथरून त्या ओलीवर ताग पेरला उगवन झाल्यावर आठ दिवसानी केळी रोपे लावली
केळी रोपाला सावली झाली उन्हाच्या ताडाख्यापासुन बचाव करण्यासाठी ताग उपयोगी ठरला. ताग सरीवर अंथरून त्यावर रासायनिक आणि शेनखत टाकले. किड्या पासून रक्षण करण्यासाठी स्टिक पँड (चिकट पडदा) एकरी सोठा दोन रंगाचे शिट लावले. रस सोशक किडे याला चिटकतात यामुळे औषध फवारणी वाचली. झाडाच्या वाढ आवश्यकतेनुसार औषध फवारणी आणि लागणारे अन्न द्रव्य ठिबक द्वारे दिले.
सप्टेंबर पासुन केळी फळधारणा वेन चालु झाली.
निर्यात करण्याचा दृष्टिकोन ठेउन त्यानुसार नियोजन केले. केळी गड वाढिनुसार यावर औषध फवारणी केली. वाढीनंतर एका फळाचे वजन दीडशे ते दोनशे ग्रँम होते. त्यानुसार फळे ठेवली,लागवडीनंतर आठव्या महिन्यात झाडांना काठ्यांचा आधार न देता एकमेकांना पक्क्या दोरीने झाडे सैल बांधली .अकराव्या महिन्यात पहिला तोडा आला व त्यांनी व्यापाऱ्यांशी संपर्क साधला. टेंभुर्णी जि. सोलापूर येथील साई फ्रुट कंपनी कडुन त्यांना मागणी आली. एक्सपोर्ट क्वाॅलीटीचा माल असल्याने पहिला तोडा (जिनाइन) हा दहा टनाचा निघाला व त्याची सौदी अरेबियात निर्यात झाली. प्रति टन १८ हजार रूपये रक्कम ॲडव्हान्स दिली. एकुन १ लाख ८० हजार मिळाले या क्षेत्रातील झाडांची सुमारे दहा तोडे होतील व त्यापासून एकरी २५ ते ३० टन जिनाईन निघेल अशी अपेक्षा आहे, असे शहा यांचे म्हणणे आहे.
“यलक्की” १२ ते १५ टन निघेल. या वाणाचा पहिला तोडा चालु आठवड्यात होईल
रिलायन्स कंपनीकडून पिक पहाणी झाली आहे. व या केळी वाणाचा दर जास्त असतो. याला तिप्पट दर मिळतो व याची शहरी भागात जास्त मागणी असते. मार्च मध्ये रमजान महिना आहे यावेळी आखाती देशात केळीची मागणी वाढत असते याचाच अंदाज घेऊन फळांची जोपासना केली जाते. गेल्या वर्षी झालेले नुकसान भरून निघेल. गेल्या वर्षी वादळी वाऱ्यामुळे केळीची झाडे भुईसपाट झाली यामधून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते यावेळी नुकसान भरून निघेल असा विश्वास राजकुमार शहा यांनी व्यक्त केला.