अंगणवाडी सेविका, मदतनिसांचा झेडपीवर मोर्चा

0

सातारा : अंगणवाडी सेविका, व मदतनीस यांच्या विविध मागण्यासंदर्भात पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघाच्यावतीने सोमवारी सातारा जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी जोरदार निदर्शने करत आपली आक्रमकता दाखवून दिली.
सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे अंगणवाडी भगिनींना पेन्शन योजना लागू करावी. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मानधनाऐवजी पगार देण्यात यावा. याबाबत शासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही.

सरकारी कर्मचारी, निम सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या धोरणानुसार महागाई वाढीनुसार ग्रॅच्युएटीच्या रकमेत वांरवांर वाढ होत आहे.परंतू अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या ग्रॅज्युएटी रकमेत अद्यापही वाढ झालेली नाही. अंगणवाडी सेविकांना शासनाने पूर्व प्राथमिक शिक्षिका म्हणून घोषित करावे.
मदतनीस यांना वर्ग ४ शासकीय कर्मचारी म्हणून घोषित करण्यात यावे. अंगणवाडी सेविकांना लाडकी बहिण योजनेअंतर्गत शासन ५० रुपये भत्ता अदा करत आहे. मदतनीस यांना देखील शासनाअंतर्गत होत असलेल्या योजनामध्ये सहभाग मिळाला पाहिजे.
शासन नवीन योजना राबवित असताना अंगणवाडी सेविका व मदतनीस या दोघींचा विचार करून त्यांना अर्थिक लाभ देण्यात यावा यासह अन्य विविध मागण्यासंदर्भात जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
यावेळी संघातर्फे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात सुजाता रणनवरे, मालन जाधव, छाया पन्हाळकर, वर्षा पवार, अर्चना अहिरेकर, ॲड. नदीम पठाण यांच्यासह अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here