अंगणवाडी हा मुलांच्या आयुष्यात महत्वाचा पाया असतो. 

0

सातारा : अंगणवाडी हा मुलांच्या आयुष्यात महत्वाचा पाया असतो. त्यांच्या जडणघडणीत तो महत्वाची भुमिका बजावतो. त्यामुळे शिक्षकाइतकेच पालकांनी मुलाकडे लक्ष्य दयायला हवे. असे प्रतिपादन अनिल वीर यांनी केले.

    अंगणवाडी क्र.४३ चे स्थलांतर अनिल वीर यांच्या मालकीच्या पाटण येथील,”बापू” या आरसीसी  इमारतीत करण्यात आले.तेव्हा अनिल वीर यांनी सदिच्छा भेट दिली.तेव्हा ते मार्गदर्शन करीत होते.ते पुढे म्हणाले,”शिक्षक हे मुलांचे उदयाचे भविष्य घडवत असतात. आनंददायी तसेच हसतखेळत शिक्षण महत्वाचे आहे. अंगणवाडीमध्ये मुलांना घडविण्यासाठी पालकासह सेविका व मदतनीस यांना कसरत करावी लागत असते.”

           सदरच्या अंगणवाडीत पेढे वाटपाचा कार्यक्रम दस्तुरखुद्द अनिल वीर यांनी दोन वेळा भेटी दिल्या होत्या.तेव्हा तेव्हा पार पाडण्यात आला. भाडे करार अंगणवाडीस सुपूर्द करण्यात आला.त्यावर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पाटील,दीपक भाकरे यांच्यासह लिहून देणारे-घेणारे यांच्याही स्वाक्षरी आहेत.यावेळी मुली,मुले व पालक मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.अंगणवाडी सेविका सौ.पुष्पा सुभाष जाधव यांनी स्वागत केले तर मदतणीस धनश्री पवार यांनी आभारप्रदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here