सातारा/अनिल वीर : ज्ञानप्रसारक शिक्षण संस्था निळेश्वर माध्यमिक विद्यालय वडोली निळेश्वर यांच्यातर्फे महाराष्ट्र अंनिसचा हसत खेळत विज्ञान आणि चमत्कारतून मनोरंजन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सदरच्या कार्यक्रमास विध्यार्थी व विद्यार्थीनीसह एकूण 250 जण उपस्थित होते. तसेच मुख्याध्यापक सचिन नलावडे, जितेंद्र जाधव,अनिल सकपाळ, श्रीराम टेके,सौ.उज्ज्वल कुंभार, सौ.डिंपल हिरवळे,सौ.निता पवार, रामराव जाधव,सुधीर पाटील,राहुल पाटील,प्रताप यादव , मनोहर पवार,संजय यादव,अक्षय पवार आदी शिक्षक, शिक्षीका,कर्मचारी वर्ग उपस्थित होते. याशिवाय इतर 270 लोकं उपस्थित होती.अंनिसचे कार्यकर्ते भगवान रणदिवे (सातारा), शिवाजी बोत्रे (कराड), अजय कांबळे (कराड),शितल अजय कांबळे आदींनी मार्गदर्शनासह वैज्ञानिक प्रयोग सादर केले. उपस्थितांनी कार्यक्रमांचा मनमुराद आनंद लुटला.