सातारा : जुने ते सोने…या न्यायाने वडीलधारी मंडळी गावाची शान वाढवतात.तेव्हा युवकांनी महापुरुष व जुन्या-जाणत्याचा सल्ला घेऊन वाटचाल केली पाहिजे.तरच गावाचा सर्वांगिण विकास होत असतो. अजातशत्रू व्यक्तिमत्त्व हे गावाचे भूषण असते. असे प्रतिपादन बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अशोकराव पाटील यांनी केले.
मारुल हवेली,ता.पाटण येथील ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते अनंत मस्के (आप्पा) यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी आदरांजलीपर मनोगत व्यक्त केले.यावेळी अनिल वीर व विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते,ग्रामस्थ, उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.
अशोकराव पाटील म्हणाले, “आप्पा यांचे राहणीमान व विचार स्वच्छ व पारदर्शक असेच होते.अखेरपर्यंत गुरा-ढोरांना घेऊन डोंगर-दऱ्यात जात होते. त्यांनी वयाची ९७ वर्षे पूर्ण केली. आम्हाला वाटले नक्कीच शंभरी पार पाडतील.मात्र,आप्पा यांनीच मृत्यूला कवटाळले होते.कारण, पडल्याने (अपघात झाल्याने) त्यांनी जेवणच वर्ज्य केले होते.”
बौद्धाचार्य विजयकुमार गायकवाड यांनी संपूर्ण विधी पार पाडला.दरम्यान, आदित्यराज देसाई यांनी कारखाना यांच्यावतीने सांत्वनपर भेट घेतली.याशिवाय,धम्मबांधव व इतर ग्रुपतर्फेही अनेक मान्यवरांनी आप्पा यांना आदरांजलीपर अर्पण केली आहे. शरद व महेंद्र अनंत मस्के यांनी आभार मानले.