अनिल वीर सातारा : कित्येक झाले आणि होतील राजे असंख्य जगती परी न शिवबासम होईल या अवनीवरती !….. या न्यायाने छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे अतुलनीय शौर्य, रणकौशल्य आणि आदर्श प्रशासन या त्रिवेणी संगमाचा अजरामर इतिहास आहे. छ. शिवराय यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अनेकांनी अभिवादन केले.
सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र घेऊन त्यांनी निष्ठावंत सैन्य उभे केले होते. तसेच प्रजाहिताला प्राधान्य देत राज्यकारभार केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे कुशल प्रशासन आपल्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.अत्यंत पराक्रमी,नीतिमान,चारित्र्यसंपन्न, लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष, स्वराज्यसंस्थापक, रयतेचे राजे, राजा शिवछत्रपती महाराजांविना स्वराज्यातील रयत पोरकी झाली आहे.खरोखरच,सर्वधर्मसमभाव याची शिकवण दिली होती.अशा आशयाचे विचार अनेकांनी अभोवादनपर व्यक्त केले.