सातारा : एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ…या न्यायाने शंकर यादव या अपंगास खाली पडलेले पाहून आम्ही त्यांना सावरले.आधार देत जीवनाचे सार्थक झाल्याचा आनंद मिळाला.थोडक्यात,चांगले करता येत नसेल तर विकृतीने उक्ती अथवा कृती करू नये.
येथील नगर वाचनालयाच्या प्रांगणात पावसामुळे चिकचिक झाली होती.अशा वातावरणात सुजान जनसमुदायासह,भटकी जनावरे व काही वाकडी-तिकडे चालणारेही होती.त्या भाऊगर्दीत अपंग असणारे शंकर यादव हळूवार चालत होते.तेवढ्यात कोण्हीतरी त्यांना धक्का देवुन शेणाचा भाग असलेल्या ठिकाणावरून पाडले असल्याने त्यांची त्रेधातिरपीट झाली होती. मुद्दामहून धक्का देणाऱ्याने मात्र पळ काढला होता.अक्षरशः घाण व शेण असलेल्या ठिकाणी यादव खाली कोसळले होते. त्यांना मात्र एका सद्ग्रहस्थाने आधार दिला होता.तेव्हा अनिल वीर यांनीही साह्य केले.यादव यांना पायरीवर सुरक्षित बसविण्यात आले.यादव दीर्घकाळ अंगावरील घाण काढत बसले होते.मात्र,ज्यांनी धक्का दिला होता. त्याबद्धल मात्र संतापाने ते लाखोली देत बसले होते.