सातारा : जिल्हयातील संविधानप्रेमी यांच्यावतीने केंद्रीय गृहमंत्री ना.अमित शहा यांनी संसदेत केलेल्या निंदनीय वक्तव्याविरोधार्थ शुक्रवार दि.२७ रोजी सकाळी १०।। वा.डॉ. आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.तद्नंतर शहरातून मोर्चा काढण्यात येणार आहे.त्या पार्श्वभूमीवर सलग चार दिवस डॉ.आंबेडकर पुतळ्याजवळ सर्व संघटनांच्या प्रतिनिधींची सहविचार सभा पार पाडण्यात आल्या.
या संदर्भात,संबोधी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष इंजि.रमेश इंजे,सम्यक ज्येष्ट नागरीक संघाचे सरचिटणीस बी.एल.माने,डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत,साहित्यिक सुदर्शन इंगळे,लोकशाहीर पुंडलिक फरांदे प्रतिष्ठानचे अध्यक्ष शाहिर प्रकाश फरांदे,बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर आदींनी मार्गदर्शन केले.शाहिर श्रीरंग रणदिवे यांनी स्वतः शहा विरुद्ध रचना केलेले गीत गाऊन वातावरणनिर्मिती केली.
प्रथमतः डॉ.आंबेडकर पुतळ्यास ज्येष्ट सामाजीक कार्यकर्ते वसंत गंगावणे व चंद्रकांत खंडाईत यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भन्ते दिंपकर (थेरो) यांच्या अधिपत्याखाली वंदनेचा विधिवत कार्यक्रम संपन्न झाला.
सदरच्या सभेस भारतीय बौद्ध महासभेचे दिलीप फणसे (जिल्हा सचिव) व विकास तोडकर (तालुका सचिव),प्रा.डॉ. आबासाहेब उमाप,विजय गायकवाड,सम्यक ज्येष्ट नागरिक संघाचे अध्यक्ष शामराव बनसोडे, सुखदेव घोडके,गणेश कारंडे, दिलीप कांबळे,वामन गंगावणे, पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले,डी. एस.भोसले,सुभाष सोनवणे,कांबळे आसणगावकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे कोषाध्यक्ष ऍड.हौसेराव धुमाळ,उपाध्यक्ष माणिक आढाव,पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.
यापूर्वी, छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील आरएमएम फुटपाथवर मूक आंदोलन करण्यात आले होते.तसेच निंदाजनक ठाराव मंजूर करून मुख्यमंत्र्यानी केंद्राकडे सादर करावा.अमित शहा यांनी माफी मागून राजीनामा द्यावा. अशीही मागणी करण्यात आली होती.अशा आशयाचे निवेदनही जिल्हाधिकारी कार्यालयात सुपुर्द करण्यात आलेले आहे.याशिवाय,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ देशाचे गृहमंत्री ना.अमित शहा यांनी बाबासाहेबांच्याबद्धल बेताल वक्तव्य केल्याबद्दल जाहीर निषेध करून आंदोलन छेडण्यात आले होते.तेव्हा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.