अल्पसंख्यांक दिवस दिनांक 18 रोजी विविध कार्यक्रमाने साजरा करावा – शफिकभाई शेख 

0

पुसेगाव दि.17

अल्पसंख्यांक दिवस दिनांक 18 रोजी सर्व जिल्ह्यातील गावागावांमध्ये आयोजित करून विविध कार्यक्रम करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष शफिक भाई शेख यांनी केले आहे. तशा आशियाचे निवेदन सातारा जिल्हाधिकारी यांना विविध मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले आहे.

   उद्या दिनांक 18 रोजी अल्पसंख्यांक दिन असून प्रत्येक गावातील सामाजिक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन हा दिवस शाळा, कॉलेजेस,सरकारी कार्यालय,  या ठिकाणी साजरा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सातारा यांनी अल्पसंख्यांक समाजाच्या वतीने देण्यात याव्यात असे  शफिक भाई शेख यांनी निवेदनाद्वारे  सुचित  केले आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून अल्पसंख्यांक समाजाचे अधिकार व त्यांचे आर्थिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रासाठी  शासकीय असणारे धोरण या योजना राबवून त्याची माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. या संदर्भांमध्ये चर्चा भाषण व्यवस्था हेही अंमलात आणण्याची गरज आहे तसेच शाळा कॉलेजेस विद्यार्थ्यांची अल्पसंख्यांक समाजासाठी गावातून रॅली काढण्याचे नियोजन करण्यात यावे, तसेच गावागावातून अल्पसंख्यांक दिनाचे बॅनर लावून त्याचे प्रसिद्धी करण्यात यावी व त्यानिमित्त ग्रामस्थांना शुभेच्छा व्यक्त करण्यात याव्यात त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम शालेय कार्यक्रमांमध्ये तसेच सामाजिक कार्यक्रम यामध्ये कवी संमेलन, मुशायरे गायन स्पर्धा विविध प्रकारच्या स्पर्धा या प्रकारचे आयोजन तसेच खेळांच्या स्पर्धा निबंध स्पर्धा याचे आयोजन करण्यासाठी, गावागावामध्ये अल्पसंख्यांक समाजाने पुढे येऊन या दिवसाचे नेटके नियोजन करून या दिवसाचा प्रचार व प्रसार करावा व याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्यांक अध्यक्ष शफिक भाई शेख यांच्या समवेत, तालुका अध्यक्ष असलम सुतार, तालुका अध्यक्ष सादिक शेख रहिमतपूर शहराध्यक्ष नसीर शेख इत्यादींनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here