महापुरुषांच्या जयंतीस प्रारंभ
अनिल वीर सातारा : प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त शनिवार दि.५ रोजी ओगलेवाडी, बुद्ध विहार, ओगले कॉलनी,ता. कराड या ठिकाणी सकाळी १० वा. बौद्ध युवा जागृत परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पाली भाषाभ्यासक प्रसाद गायकवाड व अमित मेधावी तसेच साहित्यिक प्रकाश काशीळकर मार्गदर्शन करणार आहेत.तेव्हा जिल्ह्यातील विविध पक्ष, संघटना, संस्था यामध्ये कार्यरत असलेले कार्यकर्ते, पदाधिकारी,त्याच बरोबर विद्यार्थी, युवक, युवती यांनी वेकेवर उपस्थित राहून या जागृती परिषदेमध्ये सहभागी होऊन तन-मन-धनाने सहकार्य करावे.असे आवाहन संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.अशी माहिती कैलास कांबळे यांनी दिली.
१ एप्रिल रोजी पीपल्स रिपब्लिकन पक्षातर्फे संयुक्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हापासून ठिकठिकाणी जयंती महोत्सव होत आहेत. रविवार दि.६ रोजी सकाळी १०।। वा.येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात येणार असून याच महिन्यात ठिकठिकाणी संयुक्त जयंतीनिमित्त सम्राट अशोक यांच्या जयंतीचे कार्यक्रम होणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीतर्फे गुरुवार दि.११ रोजी म.ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ सकाळी १० ।। वा.अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सायंकाळी ५ वा. जयदेव गायकवाड यांचे व्याख्यान संयुक्त जयंती समारोहतर्फे आयोजीत करण्यात आले आहे.अशी माहिती प्राचार्य अरुण गाडे यांनी दिली.सोमवार दि.१४ रोजी मुख्य दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा असून प्रामुख्याने सर्वत्र विविध उपक्रमाने जयंती साजरी केली जाते.मात्र,मे अखेर संयुक्त जयंतीचे ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. त्रिपुडी,ता.पाटण येथे संयुक्त जयंतीचे आयोजन रविवार दि.११ मे रोजी अष्टशील प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे. तदनंतर कासरूड,ता.महाबळेश्वर येथे सुमारे आठवडाभर जयंतीसह विहाराचे उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.अशीही माहिती समाजप्रबोधन मंडळातर्फे देण्यात आली आहे.सोमवार दि.१२ मे रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त मोठ्या उत्साहात कार्यक्रम होणार आहेत.