अहिर येथील प्राची संकपाळची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड

0

मेढा : येथील प्राची ज्ञानेश्वर संकपाळ हिने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग परीक्षेत महिला (इडब्ल्यूएस प्रवर्गातून) पोलीस उपनिरीक्षकपदासाठी राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. या निवडीबद्दल प्राचीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्राचीचे मूळ गाव अहिर आहे. तिचे प्राथमिक शिक्षण आखाडे येथील मेरी एंजल्स स्कूलमध्ये तसेच उच्च शिक्षण पुण्याच्या इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे झाले असून जिद्द व चिकाटीने तिने २०१९ पासून परीक्षेचा अभ्यास केला. शासनाने राज्य लोकसेवा आयोग सरळसेवा भरतीमध्ये इडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला देण्याचे धोरण राबवले होते. त्यातून पोलीस उपनिरीक्षकपदासाठी आर्थिक दुर्बलच्या प्रवर्गातून प्राची हिने राज्यात प्रथम रँक मिळविला. प्राचीच्या निवडीबद्दल तिच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण असून तिची मिरवणूक काढून आनंद व्यक्त करण्यात आला. तिचे मूळ गांव अहिर आहे 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here