अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या केसला जरी हात लागला तरी महाराष्ट्रात उद्रेक करू !

0

सातारा/अनिल वीर :  बहुजन समाजाचे वंचितांचे नेते म्हणून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे पाहिले जाते.शिवाय, बाबासाहेबांचे नातू असल्याने ते आम्हाला आदरणीय आहेत. त्यामुळे त्यांच्या केसाला जरी हात लागला. तरी महाराष्ट्रात उद्रेक करू.असे आवाहन रिपाइं(ए)चे राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी केले आहे.

         

 विशालगडमध्ये घडलेल्या प्रकरणांमध्ये वंचितचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून भिडे यांच्याबाबत जे वक्तव्य केले ते नियमाला धरून व कायद्याला अनुसरूनच होते. परंतु वाईतील काही तथाकथित कार्यकर्ते आंबेडकरांना काळे फारसण्याचा तसेच हात लावण्याची भाषा करत आहेत. तेव्हा त्यांनी आपली लायकी ओळखून आपल्या नेत्याची हुजरेगिरी करावी.अशा तथाकथित नेत्यांना आमचे कार्यकर्ते सामोरे जाण्यास सक्षम आहेत.

आम्ही जरी वेगवेगळ्या पक्षात अथवा संघटनेत असलो तरी कालही अ‍ॅड. आंबेडकर यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर होता.आदर आहे व राहीलही. त्यामुळे काहींनी वाचाळ बोलून दांभिकपणा करू नये. त्यांनी ज्या आपल्या बापाबद्दल हे असे वक्तव्य करतात. त्यांनी किमान त्या आपल्या बापाला विचारावे. अथवा, स्वतः आत्मचिंतन करावे. मगच पुसेगावमध्ये राजकिय दंगल ल-दहशत करण्याचं काम कोण करत आहे ? हे समजून येईल.असाही हल्लाबोल दादासाहेब ओव्हाळ यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here