आई-वडील यांनी महापुरुषांच्या विचारानुसार मुलांना शिकवले पाहिजे : कविवर्य साळुंखे

0
फोटो : निवकणे येथे अभिवादन करताना मान्यवर.(छाया-अनिल वीर)

सातारा/अनिल वीर : जिजाऊनी शिवराय व सुभेदार रामजींने बाबासाहेब यांना घडविले.त्याप्रमाणे प्रत्येक घराघरात आई-वडिल यांनी महापुरुषांच्या विचारानुसार मुलांना घडविले पाहिजे.असे प्रतिपादन कविवर्य तानाजी साळुंखे व प्रा.सौ. विजया म्हासुर्नेकर यांनी केले.

     कालकथीत जगन्नाथ (आबा ) जाधव यांचा तृतीय स्मृतीदिन निवकणे,ता.पाटण येथे विविध उपक्रमाने संपन्न झाला.तेव्हा कविवर्य जाधव व प्रा.विजया महासुर्नेकर यांनी कविता गायनासह मार्गदर्शन केले.जगत् – शांती प्रतिष्ठानमार्फत, धम्मदीप बौद्धजन मंडळ व निवकणे ग्रामस्थामार्फत आबांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिवशाही सरपंच संघ पाटण तालुकाध्यक्ष विजय शिंदे, तसेच पाटण तालुका बौद्ध विकास सेवा संघाचे मान्यवर, तसेच सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक,राजकीय आदी क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजलीपर आबांच्या चरित्रावर टाकला.आबांनी काबाडकष्ट करून आपल्या मुलांना शिक्षण दिले. पंचशील पालन करून सर्वांवर माया,प्रेम व आपुलकीचे धडे दिलेले आहेत. प्रथम  सत्रात बुद्ध वंदना, गाथा व पठण मंगल कार्य बौद्धाचार्य अरविंद गुजर यांनी केले.द्वितिय सत्रात आई-वडील यांच्या जीवनावर खुले काव्य संमेलन घेण्यात आले.यावेळी जेष्ठ कवी दादासो. सावंत,कवयित्री प्राध्यपिका सौ.विजया म्हासुर्णेकर, कवी तानाजी साळुंखे,कु.राजलक्ष्मी साळुंखे, श्रीमती श्रद्धा जाधव, भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या विद्याताई शिंदे आदींनी सहभाग नोंदवला. आपल्या आई वडिलांना स्मरण ठेवून कवितांचे सादरीकरण करून उपस्थितांच्या नयन पापण्यात पाणी आणून भावूक केले.कवी साळुंखे यांच्या काव्याने हुंदके अनावर झाले होते. शाहिर महावीर शिंदे यांचा आबांच्या जीवनावर पोवाडयाची ध्वनीफित  ध्वनीक्षेपकावरून ऐकवल्याने भावानिक वातावरण निर्माण होऊन आदरांजली वाहण्यात आली.यावेळी साहित्यिक प्रकाश काशीळकर-कांबळे,अरविंद गुजर  आत्माराम कांबळे,धम्ममित्र विजय भंडार,प्रकाश कांबळे, अशोकराव देवकांत,वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जगताप,आनंदा डुबल,कैलास चव्हाण,प्रविण निकम,अनिल पाटणकर, लहु पाटणकर – निवकणे गावाचे प्रथम नागरिक सरपंच जोतिबा बावधने आणि मणदुरे गावाचे सरपंच विलास कुऱ्हाडे,पोलिस पाटील प्रीती डुबल,जळव मरळोशी विकाससेवा सोसायटीचे संचालक जिजाबा भंडारे ,युवानेते हरिदास भंडारे भाऊ ,जेष्ठ नागरिक राजाराम भंडारे, पांडूरंग भंडारे, राजू पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.विजय भंडारे यांनी सूत्रसंचालन केले. जगत् – शांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय जाधव यांनी प्रास्ताविक केले. व कार्याध्यक्ष विश्वासराव जाधव यांनी आभार मानले.याकामी कार्यवाहक आणि व्यवस्थापन, धम्मदीप बौद्धजन मंडळ आदींनी अथक असे परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here