आकाशालाही वेसन घालण्याची आकांक्षा छत्रपती संभाजी महाराजांची होती – प्राचार्य डॉ. उल्हास माळकर

0

कडेगांव दि.27(प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जोपर्यंत जिजाऊ माँसाहेब होत्या तोपर्यंत संभाजी महाराजांचे आयुष्य चांगले होते. मात्र जिजाऊच्या मृत्यूनंतर त्यांच्या जीवनाची परवड सुरू झाली. संभाजी महाराजांना लहान वयापासूनच राजकीय आणि कौटुंबिक पातळीवर अडीअडचणीचा आणि समस्यांचा सामना करावा लागला. संभाजी महाराजांनी वैयक्तिक सुख-दुःखे बाजूला ठेऊन स्वराज्याची कर्तव्ये पार पाडली. आकाशालाही वेसन घालण्याची आकांक्षा छत्रपती संभाजी महाराजांची होती मात्र कटकारस्थानी लोकांनी बदनामीच्या फे-यात अडविले, असे प्रतिपादन मिरज येथिल कन्या महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास माळकर यांनी केले.

             ते कोतवडे येथे आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज कडेपूरच्या आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत-‘युवकांचा ध्यास न ग्राम शहर विकास’ च्या पुर्ततेसाठी सामाजिक बांधिलकीच्या जागृतीसाठी कोतेवडे ता. कडेगांव येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराप्रसंगी तिसरे पुष्प गुंफताना  ‘असे होते शंभुराजे’ या विषयावर बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोतवडे गावचे माजी सरपंच श्री. संजय जाधव होते. तर यावेळी कोतवडे गावच्या सरपंच श्रीमती रुपाली यादव, बचत गटाच्या प्रवर्तक सौ. ज्योती सुर्यवंशी, मुंबई येथिल अग्निशामक दलाचे माजी सेवानिवृत्त अधिकारी मा.आत्माराम यादव उपस्थित होत्या. प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजनेच्या समन्वयक प्रा.सौ. संगीता पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात विशेष श्रमसंस्कार शिबिराप्रसंगी स्मशानभूमी स्वच्छता व वृक्षलागवड केल्याचा आढावा घेतला.

                  छत्रपती संभाजी महाराज 13 भाषांमध्ये पंडित होते. प्रजाहितदक्ष, वीर महापराक्रमी योध्दा, राजकारणी, प्रतिभावंत कवी होते. मात्र असा प्रतिभावंत राजा कळायला अनेक वर्षे लागली. कटकारस्थानी लोकांनी छ्त्रपती संभाजी महाराजांची मुद्दाम बदनामी केली. त्यांचा खरा इतिहास समोर येऊ दिला नाही, असे सांगून ते पुढे म्हणाले की, संभाजी महाराजांनी 137 लढाया लढल्या व एकाही लढाईत पराभूत झाले नाहित असे अजिंक्य योध्दे होते. औरंगनेजाने आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही अशा पातशाहीना पराभूत केले मात्र छ. संभाजी महाराजांना जिंकता आले नाही म्हणून शेवटी हा शिवा का छावा पराभूत होत नाही म्हटल्यावर कटकारस्थान करुन संभाजी राजेंना पकडले व शिवाजी महाराजांपेक्षा दहा पट मोघलांना झुंजविणा-या संभाजी राजेंना हाल हाल करून मारले. संभाजी महाराजांनी आपल्या हौतात्म्याने असंख्य मराठ्यांमध्ये फुल्लिंग निर्माण केले. त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण केली असेही ते शेवटी म्हणाले.  प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजनेच्या समनव्यक प्रा.सौ. संगीता पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. राजेंद्र महानवर यांनी स्वागत केले. यावेळी प्रा. सुरज डुरेपाटील, प्रा.कुमार इंगळे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here