सातारा/अनिल वीर : केवळ आगारप्रमुख यांचे नियोजन कोलमडल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी लालपरी वेळेवर नसल्याने अध्ययनार्थीसह सर्वच प्रवासी वर्गाचे हाल होत आहेत. तेव्हा संबंधित आगारप्रमुखांनी कार्यालयीन यंत्रणा व प्रवासी यांचा मेळ घेऊन पूर्ववत व वेळेवर गाड्या सोडाव्यात. अन्यथा, आंदोलनास सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा प्रवासी वर्गाकडून येत आहे.
त्रिपुडी येथील बस सायंकाळची वेळेत येत नाही. म्हणून निषेध करत आगारप्रमुख कोळी मॅडम यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. सर्वसामान्य यांची लालपरी आहे. पाटण आगाराची त्रिपुडी – चोपडी – बेलवडे या मार्गावरील गाडी वेळेवर येत नाही.सायंकाळी ५.३० ला असणारी एसटी ७ वाजता दरोरोज उशिरा धावत असते.त्यामुळे मुलींना घरी पोहचण्यासाठी वेळ तर होतोच. परंतु, आई;वडिलांचे बोलपण बसत आहेत.याबाबत राग आणि निषेध त्रिपुडी येथे आडवून रास्ता रोको केला होता.काही काळ तणाव निर्माण झालाही होता. याबाबत अनेक वेळा उपसरपंच राहुल देसाई यांनी निवेदन दिलेली आहेत.मात्र,अद्याप दखल घेतली नाही. असून तयांची दखल घेतली नाही.आगारप्रमुख कोळी मॅडम चाल ढकल करत असल्याचे दिसून येत आहे. वाहक आणि चालक नसल्याचे कारण पुढे करत असून वेळ काढूपणा करत आहेत.यापुढे वेळेत एसटी आली नाही तर रास्ता रोको आंदोलन करू. असा इशारा निवेदनाद्वारे यांनी दिला आहे. यावेळी सिद्धी जाधव,पौर्णिमा देसाई,कादंबरी कदम,पूर्वा पाटील,अक्षता देसाई,पूजा देसाई,सानिका पवार दीपकदादा,गणेश, पवन दादा, गणेश देसाई आदी प्रवासी उपस्थित होते. आगारप्रमुख यांच्यासह संबंधित विभाग व पालकमंत्री यांनाही निवेदनाच्या प्रती देण्यात आलेल्या आहेत.