आज,”आम्ही पुस्तकप्रेमी” यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन

0

सातारा/अनिल वीर : “आम्ही पुस्तकप्रेमी” यांच्यातर्फे जागतिक पुस्तक दिनानिमित्त पहिला सभासदांचा मेळावा बुधवार दि. २६ रोजी सायंकाळी ६ वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल, शनिवार पेठ सातारा येथे आयोजित केला आहे.

                    सदरच्या मेळाव्यात सभासदांनी आपले साहित्य, आपली आवड,आपले लेखन काव्य यापैकी सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विश्वास दांडेकर व प्रमुख पाहुणे म्हणून अशोक वाळिंबे उपस्थित राहणार आहेत. गेली ८५ आठवडे दररोज एक पुस्तक परिचय आणि त्यावर चर्चा असा आगळावेगळा अभिनव प्रयोग सुरू होता. तरी या मेळाव्यास आपण उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. संदीप श्रोत्री, शिरीष चिटणीस व श्रीनिवास वारूंजीकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here