अनिल वीर सातारा : शुक्रवार दि.२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघणारा सर्व पुरोगामी संघटना व राजकीय पक्ष यांच्यावतीने निघणाऱ्या मोर्चात ओबीसी समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे.
डॉ. बाबासाहेबांचा अवमान ओबीसी समाज सहन करू शकत नाही. म्हणून केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा निषेध करण्यासाठी सातारा जिल्ह्यातून ओबीसी समाज मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. प्रत्येक तालुक्यातून येणाऱ्या बांधवांनी आपल्या गाड्या जिल्हाधिकारी कार्यालयात पार्क कराव्यात.तद्नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सकाळी 11 वाजेपर्यंत जमावे. तिथून पुढे सर्वजण बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचणार .
मोर्चाला तिथूनच सुरुवात होणार आहे. तरी तालुक्यातून येणाऱ्या सर्व गाड्या अकरा वाजेपर्यंत साताऱ्यात पोहोचणे गरजेचे आहे. उशिरा येणारे बांधव बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळच येऊन मोर्चात सहभागी होतील. येणाऱ्या ओबीसी बांधवांनी संपर्क करून ओबीसी म्हपलर व टोपी परिधान करावयाची आहे. काही अडचण असल्यास संपर्क साधावा.असे आवाहन जिल्हाध्यक्ष भरत लोकरे यांनी केले आहे.