अनिल वीर, सातारा
छ. शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात भोर येथे शनिवार दि.१४ व रविवार दि. १५ रोजी दोन दिवसीय संपन्न होणाऱ्या १० व्या राज्यस्तरीय फुले,शाहू, आंबेडकर विचार- प्रसार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि.१४ रोजी दुपारी १.३० वा.ध्वजारोहण,२ वा.संविधान रॅली तद्नंतर संपादक सम्राट फडणीस यांच्या हस्ते उदघाटन होणार असून अध्यक्षस्थान डॉ.अभिजीत होसमनी भूषवणार आहेत.प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.मिलिंद मेश्राम व डॉ.अमोल देवळेकर मार्गदर्शन करणार आहेत.सायंकाळी ४ वा.ग्रंथदालन उद्घाटन कश्यपदादा साळुंके यांच्या हस्ते होणार आहे.अध्यक्षस्थान प्रसाद शिंदे भूषवणार आहेत.
रविवार दि.१५ रोजी सकाळी १०।। वा.खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.अध्यक्षस्थान डॉ.शरद गायकवाड भूषवणार आहेत.यावेळी डॉ. ज्ञानदेव मस्के,रामदासजी काकडे, संग्रामदादा थोपटे,चंद्रकांतदादा जगताप व महादेव मोरे उपस्थीत राहणार आहेत.
पुरस्कार वितरण : यावेळी ज्येष्ट साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते,” दिवंगत खासदार बाबासाहेब साळुंके स्मृती सन्मान पुरस्कार” डॉ.नितीन राऊत (माजी मंत्री) यांना तर रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील (सातारा) यांना,” छ.शाहु महाराज – पिलर ऑफ एज्युकेशन” प्रदान करण्यात येणार आहे.याशिवाय, प्राचार्य डॉ. वौशाली प्रधान व मुख्याध्यापक लक्ष्मण भांगे यांना विशेष सन्मानीत करण्यात येणार आहे.
“जागर संविधानाचा” या कार्यक्रमात दुपारी २।। वा.काव्य नाट्य संगीतमय आंबेडकर जलसा संपन्न होणार असून सादरकर्ते शिरीष पवार,हर्षद कांबळे,प्रवीण डोणे आणि सहकलाकार,मुंबई.सायंकाळी ४ वा.समारोपप्रसंगी प्राचार्य – प्राचार्या डॉ.वृषाली रणधीर,डॉ. गुरुनाथ फगरे,डॉ.संजय कांबळे, डॉ.प्रकाश पवार,डॉ.मेघना भोसले, डॉ.प्रमोद धिवार व डॉ.गौतम बनसोडे उपस्थीत राहणार आहेत.तेव्हा संबंधितांनी सर्व कार्यक्रमास उपस्थीत रहावे. असे आवाहन संयोजन समितीतर्फे अध्यक्ष राहुल गायकवाड,कार्याध्यक्ष डॉ. रोहिदास जाधव,प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख,प्राचार्य डॉ.संभाजी मलघे व डॉ.इम्रान खान या निमंत्रकांनी केले आहे.