सातारा/अनिल वीर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा – कराड यांच्यावतीने जिल्हास्तरीय “प्रेरणा मेळावा” रविवार दि.१४ रोजी सकाळी १०।। ते सायंकाळी ४।। या वेळेत भारती विद्यापीठाच्या लॉ कॉलेज,कराड येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
डीवायएसपी (उपविभागीय अधिकारी) अमोल ठाकूर यांच्या हस्ते होणार उद्घाटन आहे.यावेळी डॉ. हमीद दाभोलकर,डॉ. शैलाताई दाभोलकर,समितीचे राज्य कार्यकारणी सदस्य आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सदरच्या मेळाव्यात जादूटोणाविरोधी कायदा – २०१३ समज-गैरसमज, वास्तव आणि प्रभावी अंमलबजावणी, सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा -२०१६, आंतरजातीय/ आंतरधर्मीय विवाह केलेल्यांच्या करता सेफ हाऊस ही महाराष्ट्र राज्याची योजना या संबंधातील माहिती,मानसिक आरोग्य व कार्यकर्ता, संघटना बांधणी, शाखा-कामकाज स्वरूप, समितीच्या विविध उपक्रमांची माहिती,गट-चर्चा (Group discussion), कार्यकर्त्यांची मनोगते आदी विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने, सविस्तर चर्चा व ऊहापोह होणार आहे.तेव्हा
सदर मेळाव्यास जिल्ह्यामधून क्रियाशील कार्यकर्ते आणि हितचिंतक उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती संयोजकातर्फे डॉ.दीपक माने,प्रशांत पोतदार आदींनी दिली.
सध्याची एकूणच सातारा, कोल्हापूर आदी जिल्ह्यातील करणी, गुप्तधन,नरबळी इत्यादीच्या घटना आणि “हातरस” येथील १२० च्यावर झालेल्या माणसांचे मृत्यू अशी सामाजिक परिस्थिती पाहता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची किती निकड आहे ? हे सर्वांना जाणवत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर सदर मेळाव्यास उपस्थित रहावे. असे आवाहन बाळ देवधर (समन्वयक, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,शाखा – कराड.) यांनी केले आहे.