सातारा/अनिल वीर : वंचित बहुजन आघाडी पाटण तालुकांतर्गत रविवार दि.८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक,म्हावशी येथे सकाळी ठीक ११ वा.महत्वपूर्ण सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती तालुकाध्यक्ष संजय जाधव यांनी दिली आहे.
तेव्हा सर्व तालुका, विभाग कार्यकारणी, युवा व महिला कार्यकारिणीने वेळेवर उपस्थित रहावे.सदरच्या सभेत विधानसभा निवडणूक विषयावर चर्चा व नियोजन करणे. पदाधिकारी यांना महत्वाचे मार्गदर्शन करणे. आपापसातील मतभेद विसरून पक्षाचे सर्वेसर्वा ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे.ऐनवेळी आलेल्या विषयावर चर्चा करणे. विधानसभा निवडणूक लढण्यासाठी जे इच्छुक आहेत.त्यांनी स्वतः हजर रहायचे आहे.असेही आवाहन महासचिव विश्वास जाधव यांनी केले आहे.