आज व उद्या डॉ.आंबेडकर जयंती  निमित्त चित्ररथास सन्मानीत करणार !

0

सातारा/अनिल वीर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीतर्फे चित्ररथास पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.त्याचे वितरण शुक्रवार  दि.१४ रोजी सायंकाळी नोंदणी करणाऱ्यास मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

     शनिवार दि.१५ रोजी सकाळी ९.४५ वा.अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रथम ३ क्रमांक पटकावलेल्या चित्ररथास व्यक्ती/शाळा/मंडळ/संस्था यांना सन्मानीत करण्यात येणार आहे. तेव्हा चित्ररथाची नाव नोंदणी संपर्क नंबरसह करावी. दि.१४ रोजी डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीमध्ये विविध मंडळ, संस्था आदी सहभागी होतात.त्या सर्वांना समितीतर्फे सन्मानचिन्ह देण्यात येणार आहेत.तरीही सर्वोत्कृष्ट  प्रथम  क्रमांकास सन्मानचिन्ह व संविधान प्रत सचिन गायकवाड यांच्यावतीने दिली जाणार आहे. द्वितीय क्रमांकास दादासाहेब ओव्हाळ यांच्यातर्फे तर तृतीय क्रमांकास  विशाल भोसले यांच्यातर्फे सन्मानचिन्ह दिली जाणार आहेत. दि.१४ रोजी सायंकाळी ६।। वा. मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. तेव्हा संबंधितांनी वेळेवर उपस्थित रहावे.असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here