अनिल वीर सातारा : येथील विविध संघटनांच्यावतीने शुक्रवार दि.२० संत गाडगे महाराज तथा गाडगेबाबा यांचा स्मृतिदिन विविध कार्यक्रमाने आयोजीत करून अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी १०.३० वा.डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ( शाहू चौक),नगर परिषद कार्यालया समोर, सातारा येथे अभिवादन केल्यानंतर छ. शिवराय यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन करण्यात येणार आहे.
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले,तोचि साधू ओळखावा.या उक्तीप्रमाणे राष्ट्रीय संत गाडगे बाबांना अभिवादन करण्यासाठी वेळेवर उपस्थित रहावे. असे आवाहन संत गाडगे बाबा स्मृतीदिन समिती,डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव व अन्य तत्सम संघटनांनी केले आहे.
दरम्यान,सातारा जिल्हा लॉन्ड्री संघटनेतर्फे कामाठीपुरा येथे सांस्कृतिक भवनमध्ये सकाळी ९ वाजल्यापासून अभिवादनपर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी ९।। वा.भजन,१२ वा.पुष्पवृष्टी आदी कार्यक्रम होणार आहेत.तेव्हा सम्बधितांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन संहटनेतर्फे अध्यक्ष शामराव सोनटक्के यांनी केले आहे.