अनिल वीर सातारा : वाचन संस्कृती वाढविण्याचा पॅटर्न ठरलेल्या सातारा ग्रंथ महोत्सवाचे शानदार उदघाटन शुक्रवार दि. १० जानेवारी रोजी सकाळी १०।। वा.एबीपी माझा वृत्तवाहिनीचे प्रमुख संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते व प्रसिद्ध लेखक कवी प्रवीण दवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. खा.श्रीमंत छ.उदयनराजे भोसले अध्यक्षस्थान भूषवणार असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन व माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
शंभरहून अधिक स्टॉलमधील विविध प्रकारच्या पुस्तकांच्या सानिध्यात आणि भरगच्च साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मांदियाळीत गेल्या २३ वर्षापासून हा ग्रंथ महोत्सव सुरु आहे. पुस्तकांची कोट्यवधी रुपयांच्या विक्री उलाढाल या महोत्सवात होत असते. या सर्वांच्या उपस्थितीमुळे ग्रंथ महोत्सवाचे उदघाटन म्हणजे रसिकांना मेजवानी मिळणार आहे.
दु
पारी दोन वाजता कथाकथन कार्यक्रमाल रवींद्र कोकरे व राजेंद्र कणसे या प्रमुख कथाकथनकारांसह निवडलेल्या निवडक कथाकारांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.सायंकाळी पाच वाजता तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्याविषयी तर सात वाजता सप्तसुरांची इंद्रधनु ही मराठी हिंदी गीतांची सुरेल मैफिल होणार आहे. याचे प्रमुख पाहुणे काका पाटील, धनंजय फडतरे, डॉ. प्रमोद फरांदे आणि सुरेश चिंचकर हे उपस्थित राहणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रंथमहोत्सवाचे कार्यवाह शिरीष चिटणीस, अध्यक्ष प्राचार्य यशवंत पाटणे आणि ग्रंथमहोत्सव समितीने केले आहे