सातारा/अनिल वीर : महाराष्ट्र पत्रकार संघ यांच्यावतीने जिल्ह्यातील समस्त जिल्हा पदाधिकारी आणि समस्त तालुकाध्यक्ष यांची बुधवार दि.३ रोजी दुपारी १ वाजता सातारा येथे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती जिल्हाध्यक्ष दिनेश लोंढे यांनी दिली.
नुतन वर्षाचा सभासद अर्ज भरण्यासाठी मिटिंगमध्ये येताना सभासद अर्जाची झेरॉक्स, ज्या दैनिक/ साप्ताहिक/ डिजिटल मिडिया आदीमध्ये काम करत आहात. त्यांचे नियुक्तीपत्र किंवा आयकार्डची झेरॉक्स व आयकार्ड साईज फोटो घेऊन यायचे आहे. वार्षिक सभासद नोंदणी फी रु.१००/- इतकी आहे.यावेळी Jकाही फेरबदल होणार आहेत. त्यामुळे सर्व पदाधिकारी,सदस्य व नवीन इच्छुक पत्रकार यांनी उपस्थित रहावे.अधिक माहितीसाठी ८८८८३३२६०८ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.