सातारा/अनिल वीर : जास्त दरवाढीचा कहर याबाबत रिपब्लिकन महिला आघाडीच्यावतीने मंगळवार दि.२५ रोजी सकाळी ११ वा. एल्गार पुकारण्यात आला आहे.
व्याजदरवर मागे घ्या.या प्रमुख मागणीसाठी रिपाईचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन होणार आहे.महिलांना हाफ तिकीटावरती एसटी प्रवास करण्यासाठी सवलत दिली आहे. परंतु गॅस दरवाढचा कहर झाल्यामुळे महिलांचे घरगुती आर्थिक बजेट कोसळले आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला गॅसच्या ऐवजी इंधन म्हणून चुल,लाकूड अशा प्रकारचा मार्ग शोधायला लागत आहे. त्यामुळे सदर दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावी. या मागणीसाठी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा दामिनी निंबाळकर व सविता सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात येणार आहे.सदरच्या आंदोलनासाठी खटाव,कोरेगाव, कराड आदी तालुक्यातून बहुसंख्य महिला पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आंदोलन झाल्यानंतर विश्रामगृह येथे दुपारी दोन वाजता पक्षाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत काही महिलेची पदे देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे.