सातारा : छ.शाहु जयंतीनिमित्त बुधवार दि.२६ रोजी विविध संघटनांच्यावतीने येथील परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ८।। वा.शाहूनगर येथे चौकात नामफलकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी १० वा.वंचितर्फे डॉ.आंबेडकर परिसरात वारसा लोकराजाचा सांगावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ११ वा.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीतर्फे पुतळ्याजवळ माजी प्राचार्य रमेश जाधव व मान्यवरांचे व्याख्यान आयोजित केले आहे. सायंकाळी ६ वा.पाठक हॉलमध्ये संबोधी प्रतिष्ठानतर्फे डॉ.सुभाष वाघमारे यांचे व्याख्यान होणार आहे.तेव्हा सम्बधितांनी वेळेवर उपस्थित रहावे.असे आवाहन संयोजकांनी केले आहे.