अनिल वीर सातारा : दीपलक्ष्मी पतसंस्था व विजय साबळे प्रस्तुत,”कलाकार अनेक गायक एक” असा मुकेशचंद माथुर… या गीत मैफिलीचा कार्यक्रम येथील मदीपलक्ष्मी संस्कृती हॉलमध्ये शुक्रवार दि.२१ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित केला आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून डॉ .श्याम बडवे, गुलाब सावंत ,गणेश शिंदे , काका पाटील , विजय साबळे शिरीष चिटणीस आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदरच्या कार्यक्रमाची संकल्पना व संयोजन विजय साबळे यांचे असून निवेदन दिपाली घाटगे करणार आहेत.
सदर गीत मैफिलीमध्ये विजय साबळे, मिलिंद हर्षे ,वैशाली चंद्रसाली, रेवती बंड ,श्वेता जाधव आदी गायक कलाकार आपली सुमधुर गीते सातारकर रसिक श्रोत्यांसाठी सादर करणार असून या कार्यक्रमास सचिन शेवडे यांची ध्वनी व्यवस्था लाभणार आहे.गीत मैफिलीमध्ये विविध कलाकारांवर चित्रित झालेली मुकेशचंद माथुर यांची सदाबहार गीते गायली जाणार आहेत.