सातारा/अनिल वीर : येथील भिमाईभुमीत सुर्यपूत्र भैयासाहेब उर्फ यशवंत भिमराव आंबेडकर यांचा जयंती सोहळा मंगळवार दि.१२ रोजीन सकाळी १० वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासह भैय्यासाहेब यांच्या प्रतीमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात येणार आहे.
यावेळी सामूहीक धम्म वंदना व सुत्त पठन,मान्यवरांचे मार्गदर्शन तद्नंतरव भिमगीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे.तेव्हा विविध संघटनेतील आंबेडकर अनुयायिनी उपस्थित रहावे. असे आवाहन संयोजकांनी केले आहे.