सातारा/अनिल वीर : माणदेशी फाउंडेशनने बेकायदेशीर बांधलेल्या बंधाऱ्या विरुद्ध म्हसवड नगरपालिकेसमोर आठवडा झाला बेमुदत आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.
रिपब्लिकन सेना माण तालुकाध्यक्ष अजिनाथ केवटे यांनी आमरण सुरू केलेले आहे. माणदेशी फाउंडेशनने माणगंगा नदी पात्रात गावाशेजारी आठ फूट उंचीचा बंधारा शासनाची कसलीही परवानगी न घेता बांधला आहे. तसेच नदीपात्रा लगत बेकायदेशीर भिंत बांधली आहे.त्यामुळे केवटे यांनी बेमुदत आंदोलनास बसले होते.त्यावेळी प्रांत यांनी लेखी दिल्यानंतर केवटे थांबले होते.मात्र, कोणतीही कारवाई न झाल्याने स्थगित केलेले आंदोलन पुन्हा सुरू केलेले आहे.
गावकऱ्यांना तसेच श्री सिद्धनाथाला आलेल्या भक्तांना नदीपात्रात जाताना अडथळा निर्माण होत असतो. येत नाही. यात्राही माणगंगा नदी पात्राजवळच भरते.पाळणे व मिठाईचे दुकाने, सिनेमा टॉकी,लोकनाट्य आदींची मांदियाळी असते.माणदेशी फाउंडेशनने मानगंगा नदी पात्रात बंधारा आणि भिंत बांधून अडथळा निर्माण केला आहे.तेव्हा वरिष्ठांनी योग्य ती कार्यवाही करावी.अशी आग्रही मागणी केवटे यांनी केली आहे.