सातारा – आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान हे ध्येय आणि धोरणाप्रमाणे काम करीत आहे.तरीही ध्येय आणि उद्देशाच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपून एक समाजकार्यात नवा आयडॉल बनले आहे. असे प्रतिपादन रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी केले.
प्रतिष्ठानच्या कराड येथील मुख्य कार्यालयात झालेल्या सहविचार सभेत खंडाईत मार्गदर्शन करीत होते.यावेळी प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याची माहिती घेऊन प्रतिष्ठानच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून कौतुकही केले.खंडाईत म्हणाले, “प्रतिष्ठानची दिवसेंदिवस वाटचाल प्रगतीपथाकडे चाललेली आहे.दिशादर्शक विचारधारा असल्यामुळे खऱ्या अर्थाने आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचाच आदर्श इतर सामाजिक मंडळांनी आणि संस्थानी घेऊन काम करावे.” सदरच्या कार्यक्रमास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कराड दक्षिण तालुकाध्यक्ष राजेंद्र कांबळे, रिपब्लिकन सेनेचे सातारा जिल्हा कार्यकारिणी सदस्य मिलिंद सावंत,राज्य संघटक गणेश कारंडे,प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वास मोहिते,उपाध्यक्षअनिल वीर, रिपब्लिकन सेनेचे करार दक्षिण तालुकाध्यक्ष प्रशांत कांबळे, प्रतिष्ठानचे मार्गदर्शक दिलीप महाजन, पेरलेचे युवा नेते प्रशांत चव्हाण, नांदलापूरचे युवा नेते प्रतीक शिर्के, कापीलचे पोलीस पाटील तुषार ढापरे,बाळासाहेब सावंत आदी विविध क्षेत्रातील मान्यवर,कार्यकर्ते उपस्थित होते. विश्वास मोहिते म्हणाले, “भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार प्रणालीनुसार सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे.कारण, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो.याच विचाराने प्रतिष्ठानची स्थापना केली असून ध्येय आणि उद्देशाबरोबर काम करीत राहणार आहे.ध्येय आणि उद्देशाच्या पलीकडे जाऊनसुद्धा सामाजिक बांधिलकी यापुढे जपण्याचं काम नक्कीच प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले जाईल.”