आपत्ती काळात नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य – पालकमंत्री शंभूराज देसाई

0

सातारा, दि. 25: सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला असून नैसर्गिक आपत्तीच्या काळात सर्वसामान्य माणसांची कोणत्याही स्थितीत गैरसोय होणार नाही यासाठी यंत्रणांनी सर्वतोपरी खबरदारी घ्यावी. दरड प्रवण क्षेत्र, भूस्खलन बाधीत क्षेत्र या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे त्वरीत स्थलांतर करण्यात यावे. पुढील तिन दिवस अतिवृष्टीचे वर्तविण्यात आले असून यंत्रणांनी 24X7 सतर्क रहावे. कोणत्याही स्थितीत नागरिकांच्या जीवाला सर्वोच्च प्राधन्य द्यावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात अतिवृष्टीबाबत पालकमंत्री देसाई यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समिर शेख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अरुण नाईक, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, सातारचे प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्यासह प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी दृरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here