सातारा : धायटी,ता.पाटण येथील ठाणे प्रादेशिक परिवहन विभागात कार्यरत असणारे आर.टी.ओ.अधिकारी महेंद्र बापु कांबळे यांचे हृदयविकाराच्या तिव्र धक्याने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,एक कन्या,जावई, चार बंधू,भावजय, पुतणे आदी परिवार आहे.
“एकमेका साह्य करु, अवघे धरु सुपंथ” या विचार सरणीचे दानशूर व्यक्तीमत्व म्हणून महेंद्र कांबळे यांनी ख्याती होती. त्यांच्या आकस्मित निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.प्रत्येक धार्मीक कार्याला व विधायक उपक्रमाला धम्मदान देऊन दान पारमितेचे पालन करणारे आदर्श व्यक्तीमत्व रविंद्र कांबळे यांचे ते जेष्ठ बंधू होत.त्यांना अनेक मान्यवरांनी आदरांजली विविध माध्यमाद्वारे आदरांजली अर्पण केली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने धम्मबांधव या ग्रुपवर भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष – मुंबईचे भगवान भोळे, सरचिटणीस रामचंद्र बल्लाळ, कोषाध्यक्ष अरविंद कांबळे,सर्व पदाधिकारी, बौद्धाचार्य, श्रामनेर,केंद्रीय शिक्षक-शिक्षिका, समता सैनिक दल, उपासक – उपासिका यांच्यासह सुनील (आबा) कांबळे – पाटील,एस. देवकांत,अनिल वीर आदिनीही आदरांजली अर्पण केली आहे.