पुसेगाव : रेवलकरवाडी (ता. खटाव) येथील यशोदा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने देण्यात येणारा यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार आमदार महेश शिंदे यांना देण्यात येणार आहे.
सामाजिक क्षेत्रामध्ये विविध प्रकारची कामे केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.
कोविड काळामध्ये केलेले काम त्याचबरोबर क्षेत्र माहुली येथे आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या वर्षश्राद्धादिवशी स्वतः रक्तदान करुन समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला. खटाव तालुक्यामधील कायम दुष्काळ असणाऱ्या भागामध्ये जिहे कटापुरचे पाणी नेर तलावात सोडून त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले.
त्याचप्रमाणे कुठल्याही अडी- अडचणीतील कार्यकर्त्यांना व गरीब गरजू लोकांना विविध पद्धतीने हातभार लावून कामे केली. त्यामुळे सामाजिक क्षेत्रामध्ये स्वच्छता, आरोग्य, पाणी, वीज पुरवठा, रस्ते, भुयारी गटारे व गावातील गल्लोगल्ली सिमेंट काँक्रीटचे कामे केली.
या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन आमदार महेश शिंदे यांना जीवन गौरव पुरस्कार देणार असल्याचे यशोदा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हरीदास जगदाळे यांनी सांगितले.