सातारा/अनिल वीर : भारत देशामध्ये लोकशाही बळकट करण्यासाठी ईव्हीएम हटाव आंदोलन कोरेगाव येथे रिपब्लिकन सेनेतर्फे छेडण्यात आले.
संविधानिक लोकशाही बचाव आंदोलन करून आगामी निवडणूका बँलेट पेपरद्वारे घेण्यात याव्यात. तसेच मोदीसरकार विकसीत भारत संकल्प यात्रा ही चुकीच्या पद्धतीने शासन राबवत आहे. ती यात्रा तातडीने रद्द करावी, लोकप्रतीनीधींचे निलंबन रद्द करण्यात यावे.सर्वसामान्य जनतेचे संविधानीक अधिकार या संकल्प यात्रेच्या निमीत्ताने पायदळी तूडवुन पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करत आहे. ते गुन्हे मागे घेऊन गुन्हे दाखल करणारांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत. या मागणी करीता धरणा – आंदोलन करून निवेदन तहसीलदार कार्यालयामार्फत राष्ट्रपती यांना देण्यात आले.
जिल्ह्यातील विविध पुरोगामी संघटनांच्यावतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.”आपल्या देशामध्ये लोकशाही बळकट करण्यासाठी सद्याची प्रचलीत ईव्हीएम या ईलेक्ट्राँनीक मशीनच्या माध्यमातून जी निवडणूक घेतली जाते.यावर जनतेचा म्हणजेच मतदारांचा विश्वास राहीला नसल्याने त्यांच्या मताधिकाराची चोरी होत आहे.अशी समज बळावत चालली आहे. जगात इतर कोणत्याही देशामध्ये मशिनद्वारे निवडणूक घेतली जात नसल्याने आपण ही निवडणूक मशिनद्वारे घेऊ नये.तेव्हा योग्य ती कार्यवाही करावी.अन्यथा,जनआंदोलन उभारले जाईल.असा इशारा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी दिला आहे.यावेळी राज्य संघटक गणेश कारंडे,ज्येष्ट नेते बंधुत्व जीवन गौरवपुरस्कार विजेते भाऊ मोहोड, तालुकाध्यक्ष माने,सचिव मोरे,पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.