उमाजी नाईक स्मृतिदिनानिमित्त अभिवादान

0

सातारा : पाच हजार क्रांतिकारक सैन्य उभे करणारे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन करण्यात आले.यावेळी भीमबुद्ध गाणी असलेले संग्रहक पुस्तक,”भीमा तुम्हा वंदना…” विलास कांबळे यांनी ऍड. विलास वहागावकर व अनिल वीर यांना भेट दिले.तेव्हा आडागळे व युवावर्ग उपस्थीत होते.

     इंग्रजांच्या जुलमी जोखडातून भारताला स्वातंत्र्य मिळावे. यासाठी पहिला सशस्त्र लढा उभारणारे उमाजीराजे नाईक होते. त्यांचे पूर्वज पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार होते. छत्रपती शिवाजीराजांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये नाईक परिवाराचे विशेषत: रामोशी समाजाचे मोलाचे योगदान आहे. छत्रपती शिवाजीराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक होते. गडकिल्ले जिंकण्यासाठी व त्यांच्या रक्षणासाठी रामोशी समाजाने सर्वस्व पणाला लावले होते. उमाजी नाईक हे

शिवाजीराजांना आपले स्फूर्ती स्थान मानत असत. शिवरायांची प्रेरणा घेऊन त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. उमाजीराजांच्या बालपणी देशात मोठी घडामोडी झाली. इंग्रजांनी पेशवाईची सूत्रे ताब्यात घेऊन दुसऱ्या बाजीरावाला नामधारी पेशवा केले. दुसऱ्या बाजीराव पेशव्याने पुरंदर किल्ल्याचे जे ९९९ अन्याय करायचं नाही. हे शिवरायांचे सूत्र त्यांनी आत्मसात केले.वतनदार आणि इंग्रज यांना त्यांनी सळो की पळो करून सोडले होते.आपल्या राज्यातील स्त्रियांचा आदर -सन्मान झाला पाहिजे.याची त्यांनी काटेकोर काळजी घेतली. स्त्रियांवर अन्याय करणाऱ्यांना त्यांनी शिक्षा केली. इंग्रजांच्या जुलमी कायद्याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. छत्रपती शिवाजीराजांच्या पावलावर पाऊल ठेवून ते राज्यकारभार करत होते. त्यांना कैद करण्यासाठी नेमलेला इंग्रज अधिकारी कॅप्टन अलेक्झांडर मॅकिन्टॉश म्हणतो की, शिवाजी महाराज हे उमाजीराजे नाईक यांचे आदर्श होते.  १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र लढा उभारणारे उमाजीराजे नाईक हे आद्य क्रांतिकारक आहेत. त्यांना १८१८ मध्ये ब्रिटिशांनी कैद केले. त्यांना एक वर्षाची कैद झाली. या एक वर्षाच्या काळात ते तुरुंगातच लेखन वाचन शिकले.शिक्षणाचं महत्त्व ओळखणारा रामोशी समाजातील पहिला क्रांतिकारक. त्यांची बुद्धिमत्ता कुशाग्र होती. एक वर्षाच्या शिक्षेनंतर उमाजीराजे नाईक इंग्रजांच्या कैदेतून बाहेर आले. बाहेर आल्यानंतर ते थांबले नाहीत. त्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूर , माणदेश,सोलापूर, कोकण, नाशिक परिसरात ५ हजार क्रांतिकारक सैनिकांची फौज उभी केली. गुप्तहेरांकडून सर्व प्रांतातील घडामोडी ते मिळवत व त्यानुसार रणनिती ठरवत आणि ती पुर्ण करत.ते उत्तम संघटक होते. प्रजेवर ते जिवापाड प्रेम करत असत.प्रजेच्या अडीअडचणी सोडवत.त्यासाठी कडेपठार, पुरंदर याठिकाणी ते दरबार भरवून न्यायनिवाडा करत.मित्रांना अत्यंत आपुलकीने वागवत असत. त्यांचे ध्येय संपूर्ण स्वातंत्र्याचे होते. त्यासाठी त्यांनी खजिना गोळा केला.त्यातून वेगवेगळ्या प्रांतात सैन्य उभारले. गुप्तहेरांचे जाळे निर्माण केले.२२ जुलै १८२६ रोजी उमाजीराजे नाईक यांना जेजुरी कडेपठार येथे राज्याभिषेक झाला. त्यांनी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. कोकणात त्यांनी दौरा केला.आंग्रे,सिद्दी,सातारचे शाहुजी यांच्या भेटी घेतल्या. वर्धमानगड,महिमानगड,ताथवडेगड,भूषणगड,हिंगणगड,मच्छिंद्रगड,वसंतगड,बाणूरगड येथील रामोशी किल्लेदारांना आपली भुमिका पटवून दिली व त्यांचेही सहकार्य मिळविले.आणि सर्व महाराष्ट्रभर एकाच वेळी हलकल्लोळ माजविला.

     उमाजीराजे नाईक सारखे जाहीरनामे प्रकाशित करून प्रजेला धीर देत व इंग्रजांविरुद्ध उठाव व आंदोलन करण्याचे आवाहन करीत. तसेच इंग्रजांना फितूर झालेल्यांना सज्जड दम देत.काही फितुरांना ठारही केले.

  १६ फेब्रुवारी १८३१ ला त्यांनी संपूर्ण देशवासियांसाठी दुरदृष्टीचा व्यापक जाहीरनामा प्रकाशित केला. त्यामध्ये त्यांनी प्रजेला आवाहन केले की, “इंग्रजांना महसूल देऊ नका. इंग्रजांची नोकरी करू नका. ज्यांचे मान-सन्मान, पदव्या गेलेल्या आहेत. त्यांना लवकरच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्व सन्मान बहाल करण्यात येतील. इंग्रजांचे राज्य नष्ट होणार आणि हे लोक लवकरच जातील आणि नव्या न्यायधिष्ठित राज्याची स्थापना होईल “.

  अर्ध्या जगावर राज्य असणाऱ्या इंग्रजांना सह्याद्रीच्या या वीराने दिलेले आव्हान निश्चितच क्रांतिकारक होते. सह्याद्रीच्या सुपुत्रांनी नेहमीच जगातील जुलमी शक्तीविरुद्ध लढा दिलेला आहे. ही प्रेरणा जिजाऊ-शिवरायांनी या मातीत निर्माण केलेली आहे. ती पुढे छत्रपती संभाजीराजे, शाहूराजे आणि उमाजीराजे नाईक यांनी कायम ठेवली.उमाजीराजे नाईकांना कैद करण्यासाठी इंग्रजांनी जंग जंग पछाडले. सह्याद्री, कोकण, पुरंदर, जून्नर, नाशिक इत्यादी दऱ्याखोरी इंग्रजांनी पिंजून काढली. परंतु उमाजीराजे नाईक इंग्रजांच्या हाती लागले नाहीत. उमाजीराजे नाईकांना कैद करण्यासाठी इंग्रजांनी मोठे बक्षीस जाहीर केले. बक्षिसाची रक्कम वाढवत वाढवत ती दहा हजार रुपये आणि ४०० बीघे जमीन (२०० एकर जमीन) देण्याचे इंग्रजांनी जाहीर केले. इंग्रज अधिकारी कॅप्टन डेव्हीस,कॅप्टन अलेक्झांडर मॅकिन्टॉश आणि कॅप्टन बॉईड, कॅप्टन ल्युकन, कॅप्टन फुलरटन, कॅप्टन डेव्हीस कारथ्युज, लेफ्टनंट शॉ, लेफ्टनंट फॉरबस, लेफ्टनंट ख्रिस्तोफर, पंतप्रतिनिधी,भोरचा संस्थानिक यांनी सह्याद्री पिंजून काढला. परंतु उमाजीराजे नाईक त्यांच्या हाती लागले नाहीत.

  उमाजीराजे नाईक भोर तालुक्यातील उतरोली या गावी असताना त्रिंबक चंद्रस या इंग्रजांच्या हितचिंतकाने विश्वासघाताने कैद केले आणि कॅप्टन अलेक्झांडर मॅकींन्टॉश याच्या ताब्यात दिले.त्यांना १५ डिसेंबर १८३१ रोजी कैद करण्यात आले. पुण्यातील खडकमाळ (सध्याच्या स्वारगेजवळ) मामलेदार कचेरी येथे त्यांना अंधार कोठडीत ठेवण्यात आले. त्यांच्यावर खटला चालविला.एक महिना खटला चालला.कैद करणारे, खटला दाखल करणारे आणि न्याय देणारे सर्व इंग्रज होते.

त्यामुळे त्यांना न्याय मिळणे शक्य नव्हते. न्यायाधीश जेम्स टेलर याने त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली. ३ फेब्रुवारी १८३२ रोजी उमाजीराजे नाईक यांना फाशी देण्यात आली. त्यावेळेस त्यांचे वय फक्त ४१ वर्षाचे होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here