सातारा/अनिल वीर : कडवे बु. ता.पाटण येथील श्रीमती लक्षिताई बबन माने (वय – ५५) यांचे डोक्यावर असणारी मागील १२ वर्षाची जट होती तिचे निर्मुलन करण्याचे काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केले.
सामाजिक स्थिती, दैवी कोपाची भीती ,मानसीक दबाव यामुळे काढणे जट झाले नाही.त्यामुळे डोके दुखी,काम करताना अडचण,पाठ दुखणे, झोपताना अडचण,अश्या तक्रारी होत्या.शरयू वारंग(तारळे) यांची जट मागील ४ वर्षांपूर्वी वंदना माने (अंनिस कार्यकर्त्या) यांनी काढली होती. त्यांना कोणताही त्रास न होता उलट त्यांचे चांगले झालेले पाहून अरविंद वारंग (शरयूताईचा मुलगा) यांना संपर्क साधला.त्यानंतर विलास भांदिग्रे (अंनिस कार्यकर्ते ) व वंदना माने यांनी समोपदेशन,प्रबोधन करून नियोजन केले. ४किलो वजनाची, ३.५ फूट लांब,८ इंच रुंद अशी जट वंदना माने यांनी काढली .
यावेळी शंकर कणसे,प्रशांत पोतदार,डॉ.दिपक माने,भगवान रणदिवे,मोहसीन शेख ,प्रकाश खटावकर,दिलीप माहादार, दादासो दुर्गवडे ,राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.लक्ष्मीताई माने यांनी आभार मानले.
याबद्धल डॉ.हमीद दाभोलकर व डॉ. शैलाताई दाभोलकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले.