सामाजिक वनीकरण सातारचा स्तुत्य उपक्रम
सातारा: प्रतिनिधी; मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल झाली आहे. वन विभागाने सामाजिक वनीकरण विभाग समाजामध्ये वृक्षसंपदा याबाबत जनजागृती पर कार्यक्रम आणि प्रत्यक्षरीत्या वृक्षांची लागवड करण्यासंदर्भाने अनेक कार्यक्रम राबविले जातात. असाच कार्यक्रम वन विभाग वन्यजीव व सामाजिक वनीकरण सातारा, यशवंत शिक्षण संस्था सुरूर यांच्या संयुक्त विद्यमाने वन महोत्सव 2024-25 या अंतर्गत “एक पेड मा के नाम” याद्वारे वृक्ष लागवड कार्यक्रमाचे 4 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत चंदन वंदन किल्ला तालुका वाई जिल्हा सातारा या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला तब्बल बाराशे विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. सर्वप्रथम सकाळी दहा वाजता स्वागत समारंभ करण्यात आला सदर कार्यक्रमास विवेक खांडेकर भारतीय वन सेवा प्रधान मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण महाराष्ट्र राज्य पुणे, आर रामानुजन भारतीय वन सेवा उपवनसंरक्षक प्राधिकरण कोल्हापूर, उत्तम सावंत भारतीय वन सेवा उपवनसंरक्षण कोयना अभयारण्य वन्यजीव कोल्हापूर स्थित कराड, आदिती भारद्वाज भारतीय वन सेवा उपवनसंरक्षण प्राधिकरण सातारा वनविभाग, श्रीमती स्नेहलता पाटील महाराष्ट्र वन सेवा विभागीय वन अधिकारी चांदोली अभयारण्य वन्यजीव कोल्हापूर स्थित चांदोली, सागर गवते महाराष्ट्र वन सेवा विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग कोल्हापूर प्रशांत वरुडे विभागीय वनाधिकारी सामाजिक वनीकरण विभाग सांगली एच एस वाघमोडे महाराष्ट्र वनसेवा विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग सातारा महेश झांजुर्णे सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती सुप्रिया शिरगावे सहाय्यक मनसंरक्षक सामाजिक वनीकरण सातारा श्रीमती हर्षाराणी जगताप महाराष्ट्र वनसेवा सहाय्यक वनसंरक्षक सामाजिक वनीकरण विभाग सातारा एस झेड दाखवले महाराष्ट्र वन सेवा वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण परिक्षेत्र सातारा, प्राचार्य अमोल डोंबाळे जिल्हा व शिक्षण प्रशिक्षण संस्था फलटण, श्रीमती रोहिणी साळुंखे सरस्वती न्यू इंग्लिश मीडियम मुख्याध्यापिका, राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक प्रकाश सोनवणे सर, श्रीमती मीनाक्षी फरांदे उपप्राचार्य, या जॉय चिल्ड्रन ॲकॅडमी वर्ल्ड अरविंद देशमुख, रवी कांबळे मुख्याध्यापक तल जोशी विद्यालय वाई, दादासाहेब पवार हायस्कूल उडतारे, सुरेश शिंदे स्काऊट प्रशिक्षक आयुक्त, भालचंद्र सोनवणे माजी महाराष्ट्र राज्य सहाय्यक आयुक्त स्काऊट गाईड महाराष्ट्र राज्य, डॉ. मोहन सोनवणे यासह विविध मान्यवर विद्यार्थी विद्यार्थिनींनी यामध्ये सहभाग घेतला.
एच एस वाघमोडे विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग सातारा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. हरित सेनेचे शिक्षक व विद्यार्थिनी यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. जोशी विद्यालय वाईच्या विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धन काळाची गरज याबाबत पथनाट्य सादर केले. त.ल. जोशी विद्यालय वाई शिक्षकाच्या मार्गदर्शनानुसार 12.74 लाख स्थानिक विविध प्रजातीचे बियाणे गोळा करून हजारो स्वीट बॉल तयार करण्यात आले होते. पिंपळ प्रजातीच्या 105 धार्मिक वृक्षांची लागवड मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. रत्नाकर लोखंडे या विद्यार्थ्याने एक लाख 5 हजार दिव्य सुनील शिवथरे, एक लाख मोहित प्रमोद मोतलिंग ,८०००० भावार्थ राहुल शिंदे, 80 हजार बियाणे गोळा केले होते .या सर्वांनी सर्वाधिक बियाणे गोळ केले बाबत त्यांचा सत्कार करण्यात आला होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. झेड ताकवले यांनी केले.
विवेक खांडेकर प्रधानमंत्री संरक्षक सामाजिक वनीकरण महाराष्ट्र राज्य यांनी एक पेड मॉं के नाम या कार्यक्रमासंदर्भात मार्गदर्शन केले एम.रामानुजम मुख्य वनसंरक्षक प्राधिकरण कोल्हापूर यांनी वृक्ष संवर्धन जलसंवर्धन याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्रीमती हर्षा राणी जगताप सहाय्यक वनसंरक्षक सामाजिक वनीकरण विभाग सातारा यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर केले.