लक्ष्मण हाकेनी स्थगित केले असले तरी ससाणे यांचे आंदोलन सुरू !!
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा ओबीसी संघटनेच्यावतीने आरक्षणाला संरक्षणसह विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण – आंदोलन सुरूच आहे. चौथ्या दिवसापर्यंत अनेक संघटनांनी भेटून पाठींबा दिला आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष भरत लोकरे,महासचिव प्रमोद क्षीरसागर,उपाध्यक्ष रवींद्र कुंभार,जयसिंग कुंभार,नवरंग कुंभार,वाई तालुकाध्यक्ष विठ्ठल कदम,सदाशिव शिंदे (बोपेगाव), वैभव गवळी,सुरेश कोरडे, चंद्रकांत कुंभार,पारधी समाज संघटनेचे अध्यक्ष उमेश चव्हाण, प्रकाश फरांदे,राजेंद्र सदाशिव राजे,ऍड.विलास वहागावकर, अनिल वीर आदी मान्यवरासह अनिल मारुती लोहार, (अध्यक्ष महाबळेश्वर तालुका), बबन झोरे (अध्यक्ष सातारा शहर ओबीसी संघटना) आदी आंदोलनकर्ते उपस्थीत होते.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत उपोषणास कार्यकर्ते बसलेले आहेत.ओबीसीसह सर्वांची जातीनिहाय जनगणना करुन लोकसंख्येच्या प्रमाणात बजेट द्यावे. त्याचप्रमाणात केंद्रात व राज्यातही प्रतिनिधीत्व मिळावे. सध्या महाराष्ट्रात आरक्षण हा गरीबी हाटविण्याचा कार्यक्रम समजला जात आहे. तो खरा प्रतिनिधीत्वाचा भाग आहे. हे समाजात रुजविणे गरजेचे आहे. आपण याविषयी आढावा घेऊन महाराष्ट्रातील शांतता व सलोखा बिघडणार नाही. याची दक्षता घ्यावी अशा मागण्यांवर आंदोलनकर्ते ठाम आहेत. राज्यपातळीवरील लक्ष्मण हाकेनी आंदोलन स्थगित केले असले तरी नवनाथ ससाणे यांचे चालू आहे.त्याचाच परिपाक म्हणून आंदोलन सुरूच आहे.