सातारा : वाचाल तर वाचाल …… याप्रमाणे मानवाने वाचन करून समृद्ध आयुष्य जगले पाहिजे. चार भिंतीच्या आत औपचारिक शिक्षण मिळत असते.याउलट अनौपचारिक शिक्षण हे समाज, सार्वजनिक मंडळ, संघटना,घर, व्यावहारिक ज्ञान,बाह्यवाचन, हस्तलिखित आदींच्या मांध्यमातून मिळत असते.तेव्हा विद्यार्थीकेंद्रित सर्वांगीण विकास होण्यासाठी शाळा,पालक,समाज आदींनी एकत्रीत येऊन कार्य केले पाहिजे.असे प्रतिपादन बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांनी केले.
मी वाचलेले पुस्तक या हस्तलिखितचा प्रकाशन सोहळा लोकमंगल हायस्कूल नागेवाडी – कुशी विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तेव्हा अनिल वीर मार्गदर्शन करीत होते. सदरचे हस्तलिखित शशिकांत जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनव उपक्रम दिवाळीच्या सुट्टीमध्ये वाचलेल्या पुस्तकावर अभिप्राय एकत्रित अध्ययनार्थींनी केलेले आहेत. वाचनाची गोडी लागावी. वाचलेले विचार आपल्या शब्दात मांडता आले पाहिजेत. हा हेतु समोर ठेवून हे हस्तलिखित तयार केले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या शब्द अभिप्राय व्यक्त केला आहे. यामुळेच विद्यार्थ्यांना विचार माडण्याची सवय निर्माण होणार आहे. अशा आशयायाची अभ्यासपूर्ण माहिती अध्यक्षस्थानावरून शिरीष चिटणीस व माजी सैनिक रामचंद्र जाधव यांनी आपापल्या मनोगतात व्यक्त करून श्रोतावर्गाना मंत्रमुग्ध केले. शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी हस्तलिखित तयार करून टप्प्याटप्प्याने प्रकाशीत करण्याचेही आवाहन संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी करताच क्षणाचाही विलंब न लावता सर्व शिक्षकांनी मान्य केले.
हस्तलिखित उपक्रमासाठी संस्थेचे आधारस्तंभ शिरीष चिटणीस यांची प्रेरणा खुप उपयोगी पडली. याशिवाय, हस्तलिखित तयार करत आसताना विद्यार्थ्यांनी खुप मदत केली.अशी माहिती प्रस्ताविकपर शशिकांत जमदाडे यांनी विविध उदाहरणाद्वारे सांगितली. कु.श्रेया जाधव व वैष्णवी सावंत यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका श्रीमती विद्या बाबर यांनी आभारप्रदर्शन केले.सदरच्या कार्यक्रमास शशिकांत जाधव, दत्तात्रय सावंत ,रमेश महामुलकर राहुल घोडके,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व अध्ययनार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.