सातारा : सुभेदार जगन्नाथ कॄष्णा गायकवाड यांच्या करंजे (सातारा) येथील निवासस्थानी सम्यक जेष्ठ नागरिक संघ यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षावास मालिकेतील १६ वे पुष्प गुंफण्यात आले. प्रथम संघाचे बी.एल.माने यांनी सुभेदार गायकवाड व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा परिचय करून दिला. नंतर सामुदायिक त्रिसरण ,पंचशील , बुद्ध पुजा, भीम स्मरण, भीम स्तुती ग्रहण महासभेचे संस्कार सचिव नंदकुमार काळे यांनी संपूर्ण विधी पार पाडला.अजित जगन्नाथ गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन केले.
“धम्म सद् धम्म व्हायचा असेल तर काय केले पाहिजे ?” या विषयावर बी.एल. माने यांनी त्या वाचनावर सविस्तर माहिती कथन केली. विशेष म्हणजे प्रज्ञा, शील व करुणा यांची ग्रंथातील अनेक उदाहरणे देऊन स्पष्टीकरण केले. या कार्यक्रमाला सम्यक जेष्ठ नागरिक संघाचे सर्वेसर्वा शामराव बनसोडे,भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस दिलीप फणसे,अशोक भोसले, दिलीप भोसले, अंकुश धाईंजे, सुखदेव घोडके,अनिल वीर, चंद्रकांत मस्के, एम.एस.भोसले, महादेव मोरे,यशपाल बनसोडे, बबन वण्णे, बाबासाहेब जगताप, अॅन्टि करप्शनचे अधिकारी वाघमारेसाहेब,सौ.मंगला गायकवाड,सौ.मोहिनी व स्वाती,स्मित,स्वजित,आरवी व नेहा आदी गायकवाड कुटुंबीय उपस्थित होते.अजित गायकवाड यांनी आभार मानले.धम्म पालगाथा झाल्यावर खिरदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.