“कराओके सिंगर्स ग्रुपने सुप्त कलागुणांना वाव दिला : जयेंद्र चव्हाण

0

सातारा/अनिल वीर : कराओके सिंगर्स क्लबच्या माध्यमातून विजय साबळे यांनी माणसातील सुप्त कलागुणांना  वाव देण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आहे.असे प्रतिपादन माजी उपनगराध्यक्ष जयेंद्र चव्हाण यांनी केले. 

          कराओके सिंगर्स क्लबच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त  आयोजित केलेल्या, ” गाणी मनातली ” या हिंदी,मराठी जुन्या, सदाबहार  गीतांच्या मैफिलीच्या उद्घाटन प्रसंगी काढले.यावेळी दीपलक्ष्मी पतसंस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले, कराओके सिंगर्स क्लबचे प्रमुख विजय साबळे,गायक कलाकार सुधीर चव्हाण, चंद्रशेखर बोकील लियाकत शेख, शिवकुमार बापूलाल  सुतार, सचिन शेरकर आदी मान्यवर उपस्थित  होते.

              जयेंद्र चव्हाण म्हणाले,”  “आपल्या मनातील एखादे गीत  कसे सादर करावे?  ते गीत मला जमेल का?  हा मनातील न्यूनगंड घालवण्याचा व गायक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देऊन तसेच त्याच्या गायकीला  दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य विजय साबळे यांनी केले आहे. या ग्रुपच्या माध्यमातून  सातारा शहरांमध्ये कराओके सिंगर्स क्लब ने जवळपास 100 गायक तयार केले आहेत. त्यातूनच उत्तम  गायक कलाकारांचा संच निर्माण झाला आहे.” कार्यक्रमाची सुरुवात  जयेंद्र चव्हाण व इतर मान्यवर यांच्या  हस्ते  दीप प्रज्वलन करून झाली.”गाणी मनातली” या कार्यक्रमामध्ये हिंदी,मराठी,सोलो युगलगीत, प्रेम गीत,भैरवी आदी यासारख्या सुमधुर,सुश्राव्य  गीतांचा समावेश करण्यात आला होता. सुरुवात विजय साबळे यांनी सादर केलेले

“कई बार यूं भी देखा है।” या  अप्रतिम गीताने झाली. यानंतर मंजुषा पोतनीस यांचे, “फुलले रे क्षण माझे” सचिन शेरकर यांचे,

” जिंदगी एक सफर है सुहाना। ” तेजल पवार,” हवा के झोके आज मौसम से रूठ गये।” राजेश जोशी,”चेहरा है या चाँद खिला है।” “कविता शिवकुमार,” ये दिल और उनकी निगाहों के साये।”

सुहास पाटील, “मुसाफिर हू यारो।” सुप्रिया चव्हाण, “वारा गाई गाणे” नागेंद्र पाटील ,”आनेवाला पल जानेवाला है।” यासारख्या गीतांना रसिकांची पसंतीची पावती मिळाली. यानंतर स्मिता शेरकर यांचे, “हे चांदणे फुलांनी ” सुनीता शालगर,”आओ तुम्हे चांद पे ले जाये।” लिखात शेख, “दिवाना लेके आया हू। “बापूलाल सुतार,”मै एक राजा हू। ” लियाकत शेख,” हे मैंने कसम ली “शिवकुमार,”पुकारता चला हु मै।” वनिता कुंभार, ” लंबी जुदाई। ” दिपाली घाडगे, ” दिल दिवाना बिन सजना के  माने ना। ” प्रशांत कुलकर्णी, “मेरा चांद मुझे आया है नजर। ” सुधीर चव्हाण, “फुलो के रंग से…” आझाद कादरभाई,  “तेरे नाम का दिवाना।” चंद्रशेखर  बोकील, “कलियों ने घुंघट खोले…” या सारख्या गीतांनी कार्यक्रम उंचीवर गेला.आग्नेश शिंदे यांचे,” लिखे जो खत तुझे” यानंतर युगल गीतांमध्ये  दिपाली घाडगे व विजय साबळे यांचे, “एक प्यार का नगमा है। ”  सचिन शेरकर व स्मिता शेरकर यांनी,”हा मैने कसम ली।” मंजुषा पोतनीस व विजय साबळे यांनी,”किसी राह मे किसी मोड पर…” कविता शिवकुमार व राजेश जोशी यांनी, ” दो पंछी दो तीन के… ” सुधीर चव्हाण व सुप्रिया चव्हाण, “ये राते ये मोसम नदी का किनारा..” लियाकत शेख  व सुषमा माने यांनी “भूल गया सब कुछ…” बापूलाल सुतार व सुनीता शालगर यांनी,”जहाँ मैं जाती  हुं वही चले आते हो…” यासारख्या गीतांनी सातारकर रसिक-श्रोते  मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमाचा शेवट विजय साबळे व वनिता कुंभार  यांच्या सदाबहार “धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना…” या गीताने झाला. सचिन शेवडे यांची अप्रतिम ध्वनि व्यवस्था लाभली. राजेश जोशी यांनी सूत्रसंचालन केले.विजय साबळे यांनी आभार मानले.यावेळी शहरातील आर्थिक,सामाजिक, कला, क्रीडा, साहित्य आदी क्षेत्रातील अनेक दिगज  व्यक्तींची उपस्थिती लाभली.रंगारंग गीत मैफिलीद्वारे समस्त सातारकर श्रोते मंत्रमुग्ध  झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here