कडेगांव दि.15 (प्रतिनिधी) भारतीय घटनेने मानवाला विविध हक्क आणि अधिकार दिले असले तरी आपणाला कर्तव्याची सुद्धा जाणिव असली पाहिजे. आपण आपली कर्तव्ये व्यवस्थित पार पाडली म्हणजे आपणास आपल्या हक्कासाठी झगडावे लागत नाही, असे प्रतिपादन बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्याल कडेगांंवच्या समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. दयावती पाडळकर यांनी केले.
ते आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज, कडेपर (ता. कडेगांव) येथे आर्ट्स अँड कामर्स कॉलेज कडेपूर व बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय, कडेगांव या दोन्ही कॉलेजच्या एम.ओ. यु अंतर्गत समाजशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या ‘मानवी हक्क आणि कर्तव्ये ‘ या विषयावर बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ.बापूराव पवार हे होते. प्रारंभी समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.सौ.संगीता पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन कार्यक्रमाचा उद्देश विशद करून सांगितला.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूराव पवार यांनी भारतीय घटनेने दिलेले हक्क आणि कर्तव्ये सांगून समाजासाठी राष्ट्रासाठी आपण आपले कर्तव्य बजावले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. सुरुवातीस समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.संगीता पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.अरुणा कांबळे यांनी तर शेवटी आभार प्रदर्शन प्रा. शिवराज उथळे यांनी केले. यावेळी नॅक समन्वयक प्रा.दत्तात्रय थोरबोले, प्रा.दत्तात्रय होनमाने व विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होतो.