कर्मयोगान्वये प्रामाणिक केलेली वाटचाल फलदायी : श्रीकांत देवधर

0

सातारा : कर्मयोगान्वये जी व्यक्ती प्रामाणिकपणे वाटचाल करते. त्यांचा भविष्यकाळ नक्कीच उज्वल असतो.असे प्रतिपादन  ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत देवधर यांनी केले.

       येथील लोकमंगल हायस्कूल,  गेंडामाळ-शाहूपुरी व प्राथमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या कलाशिक्षिका तसेच लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. शिल्पा शिरीष चिटणीस यांचा सत्कार श्रीकांत देवधर यांच्या हस्ते करण्यात आला.तेव्हा देवधर मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर होते.कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे संस्थापक – अध्यक्ष शिरीष चिटणीस,सचिव अनिल चिटणीस, मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य वि.ना. लांडगे, सुधा मंत्री, कल्याण भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

        श्रीकांत देवधर पुढे म्हणाले, “सेवानिवृत्ती हा नोकरदार मंडळींच्या आयुष्यामधला अविभाज्य भाग असतो.शिल्पा चिटणीस मॅडम अतिशय भाग्यवान आहेत. कारण,सर्व शाखात विद्यार्थी व शिक्षक त्यांचे कौतुक करत आहेत. तत्कालीन नगरसेवक शिरीष चिटणीस हे नाट्य,शिक्षण,बँकिंग,साहित्यिक, सामाजिक आदी क्षेत्रात कार्यरत होते.त्यांनी अद्यापही विविध क्षेत्रात नियमित कार्यरत आहेत. चिटणीससाहेब यांनी आपल्या पत्नीस काय आवडते ? शिवाय, त्यांची आवड कशात आहे ? हे हेरून त्यांनी मॅडमना कला क्षेत्रामध्ये पदवी घेण्यास सांगितले होते. माणसाला जीवनामध्ये सुखी, समृद्ध व्हायचे असेल तर त्याला कोणत्यातरी कलेची आवड असणे गरजेचे आहे. या ठिकाणी मी एका नाट्यकर्मीचा  सत्कार करत आहे, याचा मला अत्यंत आनंद होत आहे. शिल्पा चिटणीस यांनी लिहिलेल्या बालनाट्याचे प्रयोग तिन्ही शाळांमध्ये होतील.

                             शिरीष चिटणीस म्हणाले, “माझ्या आयुष्यामध्ये चिटणीस मॅडम यांच्या पायगुणामुळेच मी शिक्षण संस्था काढल्या. त्यांची स्फूर्ती प्रेरणा माझ्यासाठी महत्वाची ठरलेली आहे. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी जे पुण्य काम केलेले आहे. त्यामुळेच माझ्यावर जी जी संकटे आली होती. त्यामधून मी बाहेर पडलो. येत्या ५ वर्षांमध्ये त्या साहित्यिक होतील. कारण, त्यांनी शांता शेळके यांच्यावर चार लेख लिहिलेले आहेत. यापुढील कालावधीत जे जे शिक्षक निवृत्त होतील.त्यांचाही सत्कार संस्थेमार्फत करण्यात येईल. चिटणीस मॅडम यांचा चांगुलपणा त्यांना मोठेपण देऊन जाईल. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर्श लक्षात ठेवणे गरजेचे आहे. सत्कार किती मोठा होतो ?  हे महत्त्वाचे नाही. तर तो कोणासमोर होतो? कुठे होतो? हे महत्वाचे आहे.”

     प्राचार्य वि.ना. लांडगे म्हणाले, “रांगड्या मुलावर संस्कार करण्याचे काम चिटणीस मॅडम यांनी केलेले आहे. एक उत्तम प्रकारची गुणी अभिनेत्री म्हणूनही नाट्य क्षेत्रामध्ये त्यांनी नाव कमावलेले आहे. मॅडम सेवानिवृत्त होत नसून त्या सेवा प्रवृत्त होत आहेत. म्हणूनच माणूस स्वतःला कशामध्ये तरी गुंतवून घेतो ?  तेव्हा तो थकत नाही तर तो आणखी उत्साही होतो.”

       नितीनकुमार कसबे म्हणाले, “संस्कारक्षम व मायेचा हात ठेवणारे व्यक्तिमत्व म्हणून चिटणीस मॅडमकडे पाहिले जाते. हा मंगलमय सोहळा या कर्मभूमीमध्ये होत असल्याने मनस्वी आनंद होत आहे. शालीन, ममत्व असलेले व्यक्तिमत्व म्हणजे चिटणीस मॅडम असून त्यांची आई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याही शिक्षिका होत्या.” 

        सत्काराला उत्तर देताना सौ. शिल्पा चिटणीस म्हणाल्या,” मुलं समोर आहेत. म्हणूनच मला हा कार्यक्रम जास्त भावला आहे. शिक्षक होण्यासाठी व कला जोपासण्यासाठीची जी प्रेरणा मिळाली ती मला माझ्या आईकडून मिळाली.मात्र, कला फुलवण्याची प्रेरणा चिटणीससाहेब यांच्याकडून खऱ्या अर्थाने मिळाली. मी सदैव सर्व शिक्षकांची ऋणी राहीन. 

यापुढेही शाळा व संस्थासाठी अविरतपणे सेवा करत राहीन. चिटणीससाहेबांच्या विचारान्वये  पुढिल वाटचाल करणार आहे.”

      अध्यक्षस्थानावरून बोलताना अनिल वीर म्हणाले,”चिटणीस दाम्पत्य यांच्यामुळे लोकमंगल संस्थेच्या सर्व शाखात रंगकर्मी तयार झालेले आहेत.सातत्याने कविता,नाट्य,कथाकथन,रांगोळी आदी कलात्मक साहित्यांची मांदियाळी चालूच असते.त्यामुळे यापुढेही सर्वांगीण शाळा निर्माण करण्यासाठी चिटणीस दाम्पत्य भक्कमपणे पाठीशी राहतील.”

                     यावेळी शांताराम पवार, नंदा पवार, एल.ए.जाधव, हेमंत भुजबळ, कल्याण भोसले, तेजस चव्हाण,पूजा जाधव,श्रेया चव्हाण,समर्थ निकम व राहुल यादव यांनीही मनोगत व्यक्त केली.यावेळी शिल्पा चिटणीस यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकणारे  ‘कलासागर’ नावाचे हस्तलिखित  शेग्या गावित यांनी तयार केले होते.त्याचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.सदरच्या कार्यक्रमास बाळकृष्ण फडतरे, जितेंद्र टोणपे,  अनिल सुर्वे, शेग्या गावित, बाळासाहेब इंगळे, हणमंत खुडे, शोभा अनगळ, उज्वला कर्णवर, दत्तात्रय शिर्के,जगदीश खंडागळे, संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.शांताराम पवार यांनी प्रास्ताविक केले. कल्याण भोसले यांनी सूत्रसंचालन केले.अनिल सुर्वे यांनी आभारप्रदर्शन केले. सदरच्या कार्यक्रमास शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद,पालक व अध्ययनार्थी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here