कलेढोण/सातारा : कलेढोण येथील ग्रामपंचायत मधे सत्तांतर झाले असून ग्रामविकास आघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवार सौ प्रीती सुहास शेटे यांनी पदावर असताना विरोधी हनुमान पॅनल गटात प्रवेश करत सत्ताधारी ग्रामविकास पॅनलला मोठा धक्का दिल्याने आघाडीत बिघाडी झाली आहे. येथील समाजभूषण हणमंतराव साळुंखे विकास सेवा सोसायटी सभागृहात सरपंच सौ प्रीती सुहास शेटे यांच्या सह सोमनाथ शेटे, सुहास शेटे, बाबजी बुधावले, बाळासाहेब शेटे यांनी हनुमान पॅनल गटात जाहीर प्रवेश केला
या प्रसंगी हनुमान पॅनलचे प्रमुख चेअरमन संजीव साळुंखे संजय टकले, महेश पाटील, राजेंद्र नायकुडे, शेखर महाजन , गुलमुहंमद शिकलगार, राजू दबडे अभिजित दबडे, संजय महाजन, बबन नायकुडे, आदी मान्यवर उस्थितीत होते.
2021 ग्रामपंचयत निवडणुकीत ग्रामविकास आघाडीला 9 तर हनुमान पॅनल ला केवळ 6 अशा जागा मिळाल्या होत्या. ग्रामविकास आघाडी कडे बहुमत असल्याने सर्वानुमते सौ. शेटे यांना सरपंच पद दिले होते. पदग्रहण केल्यानंतर सरपंच शेटे यांनी गावच्या विकासासाठी विविध पक्षाचा निधी मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले मात्र सत्ताधारी गटातील काही अपप्रवृत्तींना स्वपक्ष सोडून इतर कोणत्याही पक्षाचा विकास कामासाठी निधी आणणे अमान्य होते तसेच इतर पक्षा कडून आलेले कोणते ही विकास काम होऊ दिले जात नव्हते. त्यामुळे भरघोस निधी मिळत असताना देखील विकासकांमावर मर्यादा येत होत्या त्यामुळे म्हणावा असा गावाचा विकास करता येत न्हवता, ग्रामपंचायत कारभारात अनेकदा जाणीवूर्वक अडचणी निर्माण केल्या जात होत्या याचा गावच्या कारभारावर विपरीत परिणाम होत असल्याने आम्ही स्वगृही हनुमान पॅनल गटात प्रवेश केल्याचे शेटे यांनी माध्यमांना सांगितले.
सौ प्रीती शेटे, सोमनाथ शेटे, बाबजी बुधावले हे मुळ हनुमान पॅनल गटातील च होते परंतु संघटने मधील मतभेदांमुळे त्यांनी या निवडणुकीत ग्रामविकास पॅनल सोबत आघाडी केली. दरम्यान ग्रामपंचायत कारभार करत असताना ग्रामविकास पॅनल मधे योग्य ते वातावरण नव्हते असे सांगून सरपंच सौ शेटे या राजीनामा न देता सरळ विरोधी गटाला जाऊन मिळाल्याने कलेढोण मधील राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.