पुसेगाव : खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे देशी जनावरांचा सर्वांत मोठा बाजार भरतो. या बाजारात महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील, तसेच परप्रांतातील कसाई मोठ्या प्रमाणावर देशी गायी आणि बैल यांची खरेदी करतात.
ही खरेदी पशूवधगृहासाठी होत असते. आम्ही पुसेगावचा जनावरांचा बाजार कसाईमुक्त करणार आहोत. यासाठी २६ डिसेंबरपासून पुसेगावच्या बाजार तळावर आमरण उपोषण करणार आहोत, अशी चेतावणी ‘अखिल भारत कृषी गोसेवा संघा’चे प्रदेशाध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी दिली. पाठक हॉल येथील पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या वेळी हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख कार्यवाहक अधिवक्ता दत्ता सणस, उमेश गांधी, प्रतीक कुलकर्णी उपस्थित होते.
मिलिंद एकबोटे पुढे म्हणाले की,१. केंद्रशासनाने गोसेवा आयोग नेमला असून वर्ष २०१५ पासून हा कायदा अस्तित्वात आला आहे. जिल्हा प्रशासन या कायद्याकडे फारसे गांभीर्याने पहात नाही. पोलिसांनाही या कायद्याची कल्पना नाही. हा कायदा महाराष्ट्रातील देशी जनावरांना संरक्षण देतो. तरीही या कायद्यावर म्हणावी अशी कार्यवाही होत नाही.
२. जनावरांच्या बाजारातील देशी गायी आणि बैल हे पशूवधगृहात नेले जातात. यामागे मोठे अर्थकारण असून विशिष्ट समुदायाला या गोमांस विक्रीतून कोट्यवधी रुपये मिळतात, तसेच हा पैसा परदेशात जाऊन त्याचा विनियोग अतिरेकी कारवायांसाठी केला जातो.
३. आम्ही २६ डिसेंबरपासून आमरण उपोषणाला बसणार आहोत. याची कल्पना ‘पुसेगाव यात्रा समिती’ला दिलेली आहे. जिल्हा प्रशासनाचीही यासाठी अनुमती घेतली आहे. यात्रा समितीने सहकार्याचे तोंडी आश्वासन दिले आहे; मात्र प्रत्यक्षात बरीचशी जनावरे पशूवधगृहासाठी विकली जातात. यासाठी शेतकर्यांचे प्रबोधन होणेही आवश्यक आहे.
हिंदुत्वनिष्ठांना जनावरांच्या सुरक्षेसाठी आमरण उपोषण करण्याची वेळ का येते ? प्रशासन स्वतःहून यामध्ये लक्ष का घालत नाही ?