सातारा/अनिल वीर : अनुसूचित जाती व जमाती आरक्षणात उपवर्गीकरण आणि क्रिमीलेअर संबंधी सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणाच्या विरोधात कायदा करून क्रीमीलेयर व कोट्यातून कोटा हा प्रकार नाकारला पाहिजे.
सर्वोच्च न्यायालयापेक्षा सविधान हे सर्वोच्च आहे. सर्वोच्च असल्यामुळे आरक्षणाचा आधारही सिवा-शीव तसेच उच्चनीचता हा महत्त्वाचा विषय आहे.त्यामुळेच आर्थिक, सामाजिक व राजकीय समानता येण्याकरता आरक्षणाची गरज आहे. परंतु आरक्षणाच्या कोट्यातून कोटा करून वर्गीकरण करणे म्हणजेच जाती-जातीमध्ये भांडण लावणे होय. जाती जातीचे आरक्षण संपवणे आहे.
एकंदरच एका जातीने शिक्षणामध्ये फायदा घेतला असेल तर दुसऱ्या जातीने राजकीय फायदा राजकारण्यांनी दिला आहे. तिसऱ्या जातीने व्यवसायाच्या माध्यमातून प्रगती केलेली आहे. म्हणजेच सर्वच जातीतील आरक्षण संपवणे हा सुद्धा एक भाग जातीवादी सरकारच्या माध्यमातून याचिकर्त्यांनी केलेला दिसून येत आहे. त्यामुळे एकंदरच क्रिमिलेअरच्या माध्यमातून वर्गीकरणाच्या माध्यमातून वंचितांना म्हणजेच अनुसूचित जाती जमातींना हक्क नाकारण्याचा आणि हजारो वर्षापासून विशेष अधिकाराचा लाभ घेणाऱ्या तो देण्याचा प्रकार निषेधार्थ आहे.जोपर्यंत जातीभेद राहील. तोपर्यंत आरक्षण असावे. ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) ची आग्रहाची मागणी आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पक्ष यासाठी जन आंदोलन उभा करेल. अनेक ठिकाणी सरकारी नोकऱ्यांमध्ये खाजगीकरण झालेले आहे. त्या ठिकाणी भरती होत नाही.
अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांना त्या ठिकाणी उच्चस्पदावरती स्थान दिले जात नाही. एवढे कारण जातीभेद संपला नाही. हे सांगण्यास पुरेशे आहे. सर्वोच्च न्यायालयापेक्षा संविधान हेच सर्वोच्च आहे. त्यामुळे संविधानाची कठोर अंमलबजावणी करण्याकरता कायदा करून क्रीमीलेयर व कोट्यातून कोटा हा प्रकार नाकारण्यात यावा. लवकरच याबाबत प्रत्येक जिल्ह्यामध्ये निवेदन देऊन केंद्र सरकारकडे मागणी करण्यात येणार असल्याची माहिती राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी दिली. याबाबत लवकरच पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये याबाबत विचारविनिमय करून कायदेशीर तज्ञांची मदत घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल.या बाबत निवेदनच्या प्रती पंतप्रधान ना.नरेंद्र मोदी,विरोधी पक्षनेते राहुल गांधी,मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे,राष्ट्रीय पक्षाध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे,महासचिव मोहनलाल पाटील, जिल्हाधिकारी,जिल्हा
पोलीस निरीक्षक व शहर तसेच सम्बधितांना पाठविण्यात आलेल्या आहेत.