सातारा/अनिल वीर : घरात घुसून मारू असे दलितांसाठी वक्तव्य करणाऱ्या भाजपा आमदार राम कदम यांनी चंद्रकांत पाटील यांच्या समर्थनात जी भाषा केली आहे. ती चीतावणीखोर,कायदा व सुव्यवस्था बिघडवणारी आहे. त्यामुळे राम कदम यास साताऱ्यामध्ये फिरू देणार नाही. असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी दिला आहे.
सर्व समाजाच्या जीवावरती आमदार झालेल्या लोकप्रतिनिधीने एखाद्या विशिष्ट समाजाबद्दल बेताल वक्तव्य करून आगीत तेल ओतण्याचा प्रकार करत आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर,म. ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आदीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे अगोदरच समाजामध्ये चीड निर्माण झालेली आहे.तेव्हा राम कदम यांनी भीमसैनिकेच्या अस्मितेला हात घालण्याचा प्रयत्न करू नये.मागील एका प्रकरणात राम कदम हे लपून बसले होते.आता त्यांना पळता भुई कमी होईल याचं भान ठेवावं.
ज्यांना महाराष्ट्रामध्ये अराजकता पसरवायची आहे. या निंदनीय गोष्टीची सुद्धा आम्ही निषेध करीत आहोत.मुख्यमंत्री यांच्याकडे याबाबत पत्रव्यवहार करून अशा राजकारण्यांवरती कारवाई होण्याकरता मागणी करणार आहोत. चितावणीखोर वक्तव्य करणाऱ्या रामदास कदम यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. कारण संपूर्ण महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा आहे.नक्कीच
आम्ही त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांचे कार्यकर्ते राम कदम यांना जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाहीत.एवढं मात्र निश्चित आहे.असाही पुनरुच्चार ओव्हाळ यांनी केला आहे.