कारवाई न झाल्यास भटक्या कुत्र्यांना घेवून पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर लक्षवेधी आंदोलन

0

सामाजिक कार्यकर्ते गणेश ( आबा )  वाघमारे यांची माहिती

पाटणप्रतिनिधी: मागील एक वर्षा पुर्वी सातारा नगरपालिका आरोग्य विभागाचे भटक्या श्वान लसीकरण,  निरबीजिकरण, उपचार व पुनर्वसन कामासाठी लाखो रुपयाचे टेंडर निघाले मात्र प्रत्यक्षात मागील एक वर्षात संबधित संस्थेने काहीच काम केले नाही. याबाबत माहिती अधिकारातून माहिती मागवल्यानंतर प्रकरण उघडकीस आले आहे. त्यामुळे एका वर्षात भटक्या कुत्र्यांच्या नावाने काम करत असल्याचा आव आणणाऱ्या नगरपालिका आरोग्य विभाग अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्या संगनमताने फक्त सातारा च्या जनतेला फसवण्याचा काम केले आहे. 

त्याचाच जाब विचारण्याची सामाजिक कार्यकर्ते गणेश ( आबा ) वाघमारे , ऋषी गायकवाड,  अनिल बडेकर , कमल हराळे , उमेश खंडूझोडे व प्राणी मित्र कार्यकर्ते,  पर्यावरण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात  सहभागी झाले होते यावेळी निवेदन देवून भटक्या श्वानाच्या ठेक्या मध्ये अधिकारी व संबंधित संस्था यानी बेजबाबदार व हलगर्जीपणा करत कामच केले नाही त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा शहरातील प्रत्येक पेठे मध्ये उपद्रव वाढलेले आहे. त्यामुळे सामन्य सातारकर यांचे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. व शेकडो नागरिकांच्या भटक्या कुत्र्याने चावा घेवून जखमी केले आहे.

असे असताना देखील  सातारा नगरपालिका प्रशासन अधिकार आणि आरोग्य विभाग टेंडर दिलेल्या संस्थेला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे सातारच्या नागरिकांचा आरोग्याचा, सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असुन त्याबाबतचे निवेदन स्विकारायला जबाबदार अधिकारी वेळ देत नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.  त्यामुळे यापुढे नगरपालिका अधिकारी यांना निवेदन न देता सोमवारी दिनांक. 7 ऑक्टोबर 2024 रोजी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या निवासस्थान बाहेर शहरातील भटक्या कुत्र्यांना घेवून नगरपालिका व संबंधित संस्था यांचेवर कारवाई करण्याबाबत निषेध लक्षवेधी आंदोलन करणार असल्याचे भूमिका घेतली आहे. यावेळी निर्माण होणार्‍या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नासाठी संपूर्ण नगरपालिका प्रशासन अधिकारी जबाबदारी राहतील असे नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here