देशमुखनगर : काशीळ ता सातारा गावचे हद्दीत पुणे बेंगलोर हायवेवर तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एकजणाचा मृत्यू झाला. अभिजित सर्जेराव पाटील वय ३६ वर्षे रा खोजेवाडी ता सातारा असे मृत्यु झालेल्या इसमाचे नांव आहे’
बोरगांव पोलीस ठाण्यातुन मिळालेल्या माहितीनुसार एस. टी महामंडळाची कुरूंदवाड पुणे बस कराड ते सातारा लेनवर काशीळ गांवच्या हद्दीत आली असताना पाठीमागुन आलेल्या मालट्रकने जोराची धडक दिली. बस चालकाने बस थांबवुन पाठीमागे येऊन पाहिले असता दोन्ही वाहनांच्या मध्ये एक मोटारसायकलस्वार अडकला असल्याचे दिसुन आले. त्याल्याही मालट्रकने धडक देऊन गंभीर जखमी केले होते. त्यास जमलेल्या लोकांनी रूग्णवाहीकेतुन उपचारासाठी सातारा येथे पाठवले होते. परंतू रूग्णालयात उपचार घेताना त्याचा मृत्यु झाला.
या अपघाताची खबर बसचालक महेश विलास कांबळे यांनी बोरगांव पोलीस ठाण्यात दिली असुन गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय देसाई करत आहेत.