सातारा : येथील दीपलक्ष्मी सांस्कृतिक हाॕलमध्ये दीपलक्ष्मी पतसंस्था आणि “एरा म्युझिकल ग्रुप प्रस्तुत” आयोजित “मेरी आवाज ही पहचान हैं।” हा हिट्स ऑफ कुमार सानू यांनी गायलेल्या अविस्मरणीय गितांचा बहारदार कार्यक्रम मोठ्या उत्साहात सादर करण्यात आला. दीपप्रज्वलन प्राचार्य रमणलाल शहा,अनिल वाळिंबे, प्रशांत कुलकर्णी,अनिल वीर, जगदीश खंडागळे,शिरीष चिटणीस आणि कलाकारांच्या हस्ते करण्यात आले.
उत्तम पद्धतीने अष्टपैलू गायक प्रविण जांभळे व गेस्ट गायिका-हलिमा दिदी आणि सुजाता दरेकर यांनी विविधता असणारी असंख्य गिते अभुतपुर्व, अवर्णनीय व अत्यंत सुमधुर आवाजात सादर केली. निवेदिका-गायिका शामल काकडे यांनी अलंकारिक भाषेत प्रत्येक गितांचे वर्णन करीत छान पद्धतीने सूत्रसंचालन केले. सदरच्या कार्यक्रमास हाऊसफुल्ल अशी संगितप्रेमींची उपस्थिती होती. सर्व गाणी अप्रतिमरित्या सादर केल्याने श्रोतावर्ग मंत्रमुग्ध झाला. एकंदरीत संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन-नियोजन व कुमार सानूची यांची गाणी झाल्याने मेजवानीच मिळाली. आल्हाददायक साऊंड सिस्टीमसुदधा अप्रतिम होती.